AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शेतकरी-ग्राहक कंगाल, व्यापारी मालामाल’, लॉकडाऊनचा सर्वात जास्त फायदा धान्य व्यापाऱ्यांना

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला आहे (APMC Market Navi Mumbai amid Corona lockdown).

'शेतकरी-ग्राहक कंगाल, व्यापारी मालामाल', लॉकडाऊनचा सर्वात जास्त फायदा धान्य व्यापाऱ्यांना
| Updated on: Apr 11, 2020 | 10:45 PM
Share

नवी मुंबई: कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा उठवत एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला आहे (APMC Market Navi Mumbai amid Corona lockdown). मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानं बाजारात खळबळ उडाली होती. त्यामुळे येथे काम करणाऱ्या माथाडी कामगार, ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दुसरीकडे धान्य मार्केटमध्ये काही व्यापारी कोरोनाचा फायदा घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य, डाळी मागवत आहेत.

धान्य मार्केटमध्ये 2 दिवसात 1350 गाड्यांची आवक झाल्याने धान्य खरेदी विक्रीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे .बाजारात काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी सांगितल्याप्रमाणे बाजारात एवढ्या प्रमाणात आवक यापूर्वी कधीही नव्हती. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सोश डिस्टन्सिंगचे बाजार आवारात तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळालं. कोणतीही प्राथमिक काळजी न घेता व्यापारी व्यवहार करताना दिसून येत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

एपीएमसी प्रशासनाने 11 एप्रिलपासून कांदा बटाटा, भाजीपाला आणि फळे बाजार पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुदतवाढीची घोषणा केली. सध्या अत्यावश्यक गोष्टी सोडून इतर वस्तूंचे दुकानं बंद आहेत. कोकण आयुक्त शिबाजीराव दौड यांनी मध्यस्थी करत बाजार सुरु केला. परंतु बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सध्या नवी मुंबईत कोरोनाचे 33 रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी महानगरपालिका आणि एपीएमसी प्रशासन जोरात कामाला लागले आहे. धान्य बाजारात व्यापाऱ्यांकडून जास्त धान्य मागवल्याने पूर्ण परिसरात गर्दी दिसून येत आहे. गाड्यांची गर्दी इतकी आहे की पूर्ण बाजार आवाराभोवती गाड्या उभ्या असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या गाड्या आत घेतल्याने हळूहळू गाड्या आत सोडल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

लॉकडाऊन पूर्वी मुंबई एपीएमसी दाना मार्केटमध्ये 70 रुपये दराने विकल्या जाणाऱ्या तूरडाळ, चना डाळ आता 90 ते 105 रुपये दराने विकले जात आहे. 90 रुपये दराने विकली जाणारी मुगडाळ 125 रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणारी ही लूटमार थांबवण्यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

कोरोनामुळे राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. टाळेबंदीचा लोकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला, कडधान्य यांची दुकाने तसेच वाहतुकीस सरकारने परवानगी दिली आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक दूर करण्यासाठी सरकारने काही वर्षांपूर्वी फळे-भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता याचाच फायदा उठवत शेतकऱ्यांची अडवणूक आणि ग्राहकांची लुबाडणूक करण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई एपीएमसीत धान्य मार्केट भाजीपाला व फळ मार्केटची उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडन होत आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

APMC Market Navi Mumbai amid Corona lockdown

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.