लाडक्या बहि‍णीचा मोठा भाऊ तरी कोण? देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर तरी काय

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजनेचा महायुतीतील मोठा भाऊ आहे तरी कोण? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. सध्या या योजनेवर राज्य सरकारने फोकस केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरुन वाद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उत्तर दिले.

लाडक्या बहि‍णीचा मोठा भाऊ तरी कोण? देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर तरी काय
लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ कोण?
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 12:26 PM

लाडकी बहीण योजनेचा महायुतीतील मोठा भाऊ आहे तरी कोण? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. सध्या या योजनेवर राज्य सरकारने फोकस केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरुन वाद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उत्तर दिले. टीव्ही9 मराठी कान्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प शाश्वत विकास संमेलनात त्यांना व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी लाडकी बहीण योजनेचा महायुतीतील मोठा भाऊ आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला होता.

मुख्यमंत्र्यांकडे योजनेचे श्रेय

लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकार फोकस करत आहे. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तीन ही पक्ष या योजनेचे श्रेय घेत आहेत. अजित पवार यांनी या योजनेच्या श्रेयवादात मोठी आघाडी घेतली आहे. त्यावरुन कॅबिनेट बैठकीत खडाजंगी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्र्‍यांमध्ये त्यावरुन वाद झाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली या चर्चेवर पण त्यांनी मत व्यक्त केले. असा कोणताही वाद झाला नाही असे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ कोण?

लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी महायुतीतील तीन ही पक्ष पुढे आले आहे. या तीनही पक्षात श्रेयवादासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ कोण? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हसून बोलणे टाळले. त्यांनी थेट उत्तर दिले नाही. लाडकी बहीण योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे ते म्हणाले.

वेगवेगळ्या योजना चालल्या आहेत. लाडकी बहीणला जास्त फोकस मिळत आहे. त्यात इन्व्हॉल्मेंट अधिक आहे. ५० टक्के महिला त्यात आल्या, त्यामुळे त्याच्यावर फोकस अधिक आहे. आम्ही इतर योजनाही सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पिकविमा योजना आणली आहे. दीड हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिले आहे. कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देत आहोत. दूध उत्पादकांनाही सात रुपये देत आहोत. हे महत्त्वाचं काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहोत. केवळ दीड वर्षात १२ हजार मेगावॅटचं काम सुरू केलं. ते १८ महिन्यात पूर्ण करू. १६ हजार मेगावॅट वीज देण्याचं काम करू.

गिरना खोऱ्यात नारपारचं १० टीएमसी पाणी देणार आहोत. या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला पाहू देणार नाही. सांगली कोल्हापुरात पूर येतो. त्याचं पाणी डायव्हर्ट करणार. लाडकी बहीणसह आम्ही शाश्वत विकासाची कामेही करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्.
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?.
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.