AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये, पाहा व्हिडीओ

12 तारखेला विधान परिषदेची निवडून आहे. त्याआधी पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स सुरु होणार आहे. कारण गुप्त मतदान असल्यानं मतं फूटण्याची दाट शक्यता आहे. तर 3 मतं असणाऱ्या बहूजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांनी आधी शरद पवारांची भेट घेतली... त्यानंतर शिंदे फडणवीसांनाही भेटलेत.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये, पाहा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jul 09, 2024 | 2:57 PM
Share

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 तारखेला मतदान आहे. त्याआधी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरु आहे. 11 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं एक एक आमदारांचं मत, महत्वाचं आहे..त्यातच गुप्त मतदान होणार असल्यानं खबरदारी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष आपआपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार लोअर परळच्या ग्रँड आयटीसी हॉटेलमध्ये राहणार काँग्रेसही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. शरद पवार गटानं हॉटेल बुकिंग न करण्याचं ठरवलंय. महायुतीकडूनही भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. महाराष्ट्रातल्या आमदारांना हॉटेल पॉलिटिक्स नवीन नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठेवलं होतं. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दगाफटका नको म्हणून शरद पवार गट सोडून इतर सर्व पक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत.

दुसरीकडे मतांची जुळवाजुळव सुरु झाली असून हितेंद्र ठाकूरांकडे महायुती आणि मविआ दोघांची नजर आहे…बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत.. पण हितेंद्र ठाकूर नेमके कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय. कारण हिंतेंद्र ठाकूरांनी आधी शरद पवारांची भेट घेतली नंतर महायुतीच्याही नेत्यांना भेटले. पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठींबा दिलाय. त्यामुळं जयंत पाटलांना निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवारांचीही आहे..त्यासाठीच हितेंद्र ठाकूरांच्या बविआची 3 मतं मिळवण्यासाठी शरद पवारांनी हालचाली सुरु केल्यात. मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर, हितेंद्र ठाकूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली. विधीमंडळात हितेंद्र ठाकूरां सोबत शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली. त्यामुळं हितेंद्र ठाकूरांची मतं कोणाकडे जाणार यावरुन सस्पेंस वाढलाय.

याआधी हितेंद्र ठाकूरांना विचारणा केली असता, माझ्यावर कोणीही दावे करु शकत नाही, असं हितेंद्र ठाकूर म्हणालेत. विधान परिषदेच्या ज्या 11 जागांसाठी निवडणूक होतेय..त्यासाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. सध्या विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ 274 आहे आणि विजयाचा कोटा 23 मतांचा आहे. महायुतीनं 9 उमेदवार दिलेत. तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत. महायुतीकडे भाजपचे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वत:चे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. एकूण महायुतीकडे मतं आहेत, 197…9 व्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवीत.

पाहा व्हिडीओ:-

महाविकास आघाडीची मतं पाहिली तर. काँग्रेस 37, ठाकरेंची शिवसेना शंकरराव गडाख या एका अपक्षांसह 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं  अशी एकूण 66 मतं होतात. मविआचे 3 उमेदवार आहेत.. तिसऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवीत.. मात्र क्रॉस व्होटिंगच्या भीतीनं काँग्रेसनं प्रत्रा सातवांना 3-4 अधिक मतं दिली तर आणखी मतं लागतील. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही छोट्या मित्रपक्षांची मदत हवीच आहे.

बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं, प्रहारचे 2, एमआयएम 2 आणि समाजवादी पार्टी 2, मनसे 1 आणि माकपचा 1 आमदार आहे. ही एकूण मतं आहेत 11. मात्र, या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीनं मतदान होणार आहे. त्यामुळं क्रॉस व्होटिंगची दाट शक्यता आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीनं 1 उमेदवार मागे घ्यावा, असं फडणवीस म्हणाले होते..पण आमच्याकडे विजयाची मतं असल्याचं सांगत मविआनं उमेदवार मागे घेतला नाही.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढतायत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांनी निवडणुकीत उडी घेतल्यानं मतांच्या फुटीची धाकधुक वाढलीय. कारण नार्वेकरांचं सर्वपक्षीय संबंध असून ते निवडून येतील, असं भाजपच्याच दरेकरांनीच म्हटलंय. त्याचवेळी विकेट मविआचीच जाईल असा दरेकरांचा दावा आहे. 2 वर्षांआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली होती. फेब्रुवारीतही राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटून हंडोरेंचा पराभव झाला होता. त्यामुळं या निवडणुकीत मतं फुटून नयेत म्हणून महाविकास आघाडीही अलर्ट आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.