कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत दुमजली इमारत; रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

परराज्यातून तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक लोक कॅन्सर आणि इतर गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईत येतात.

कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत दुमजली इमारत; रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
Ramdas Athavale
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 7:30 PM

मुंबई : परराज्यातून तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक लोक कॅन्सर आणि इतर गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईत येतात. त्या रुग्णांना आणि त्यांच्या शुश्रुषा करणाऱ्या नातेवाईकांना मुंबईत राहण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना रस्त्यावर राहावे लागते. ही समस्या काही प्रमाणात दूर करण्यासाठी मुंबईत दाणा बंदर येथे राज फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ईश्वरी सेवा सदन या दुमजली इमारतीत 14 खोल्यांची विनामूल्य निवास आणि भोजन व्यवस्था रुग्णांसाठी आणि त्यांची देखभाल करणाऱ्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. (two-storey residential building in Mumbai for cancer patients and their relatives; Inauguration by Ramdas Athavale)

कॅन्सर आणि इतर गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी मुंबईत विनामूल्य निवास व्यवस्था करून देण्याचा राज फाउंडेशनचा उपक्रम चांगला आहे. दुमजली इमारतीत 14 खोल्या रुग्णांसाठी उपलब्ध केल्या आहेत. या उपक्रमाला अधिक मोठे करण्यासाठी या संस्थेला भारत सरकार तर्फे मदत करण्याचा प्रयत्न करू, तसेच खासगी उद्योजकांकडून सीएसआर फंडामार्फत मदत मिळवून देऊ असे, आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

भारत देशात आज ही असे लोक आहे जे दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करतात. कोरोनाच्या काळात अनेक कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करीत आहेत. सेवाभाव मनाशी बाळगून राज फाउंडेशन रुग्णसेवा करीत आहे. या इमारतीच्या 14 खोल्या रुग्णांना विनामूल्य देऊन भोजन ही विनामूल्य देण्यात येणार आहे. ही मानवसेवा आदर्श असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

यावेळी राज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार गुप्ता, वंदना गुप्ता, राम कुमार गुप्ता, कमलेश शेठ, महेश खर्द, शरद गुप्ता, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार, विशाल दिवर, विशाल गायकवाड, सचिन आठवले, अकबर शेख मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या

मी गायब होणारा नेता नाही, मुंबै बँक घोटाळ्यातील आरोपांवरुन दरेकरांनी विरोधकांना ठणकावलं

मुंबईत पोलीस कुटुंबीयांचे मोफत लसीकरण, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

मोठी बातमी: मुंबई विमानतळालगतच्या 80 हजार झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

(A two-storey residential building in Mumbai for cancer patients and their relatives; Inauguration by Ramdas Athavale)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.