AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, मग उदयनराजे का असेना; पूजा चव्हाण प्रकरणी उदयनराजे कडाडले

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (udayanraje bhosale's first reaction on pooja chavan suicide case)

चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, मग उदयनराजे का असेना; पूजा चव्हाण प्रकरणी उदयनराजे कडाडले
| Updated on: Feb 27, 2021 | 7:12 PM
Share

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजप नेते, खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजेही का असेना, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. (udayanraje bhosale’s first reaction on pooja chavan suicide case)

उदयनराजे भोसले यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. यावेळी उदयनराजे यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकशाहीत सर्व निवडून दिलेले आमदार, खासदार आहेत. सर्वांनी जबाबदारीने वागायला आणि काम करायला हवं. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. कायद्यात सर्व समान आहेत. चुकीचं केलं असेल तर शासन व्हायलाच हवं. उदयनराजे असले तरी शासन हे व्हायलाच हवं, असं उदयनराजे म्हणाले.

राज यांच्याशी आरक्षणावर चर्चा

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी कोणतीही पक्षीय लेव्हलची किंवा राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, मराठा आरक्षणावर राज यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये असं त्यांना सांगितलं होतं. कोणाच्या आरक्षणावर गदा देखील येऊ नये. इतर समाजातील नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील लोकांना देखील भेटायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असं उदयनराजे म्हणाले. तसेच उद्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचं आयोजन केले आहे, त्यानुषंगानेही चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

राजमुद्रा भेट

उदयनराजे भोसले यांनी कौटुंबीक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच ‘कृष्णकुंज’वर आल्याने राज यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला.

भाजपच्या महिला मोर्चाचं जोरदार आंदोलन

दरम्यान, भाजपच्या महिला मोर्चाने आज संपूर्ण राज्यात एकाच वेळी जोरदार आंदोलन केलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. यावेळी राज्य सरकार आणि वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. राज्यात 100 ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे 20 हजार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.कोरोना चे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले, असा दावा भाजपने केला आहे. महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. आमदार सीमा हिरे यांनी नाशिक येथे आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार विद्या ठाकूर, आमदार श्वेता महाले आणि आमदार मनिषा चौधरी याही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. (udayanraje bhosale’s first reaction on pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?

उद्धवजींना इशारा देतो, सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, तर… : चंद्रकांत पाटील

(udayanraje bhosale’s first reaction on pooja chavan suicide case)

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.