AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav-Raj Thackeray : निमित्त तर वाढदिवसाचे, चर्चा मात्र मनसे-शिवसेना युतीची, राजकीय मैदानावर नवी खेळी

Uddhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. हे नवीन राजकीय वळण पाहण्यासाठी राज्यातील कार्यकर्ते आसूसलेले होते. राज्यात नवीन युतीची ही नांदी म्हणावी लागेल

Uddhav-Raj Thackeray : निमित्त तर वाढदिवसाचे, चर्चा मात्र मनसे-शिवसेना युतीची, राजकीय मैदानावर नवी खेळी
उद्धव ठाकरे-राज ठाकरे युती
| Updated on: Jul 27, 2025 | 12:49 PM
Share

MNS-Shivsena Alliance : उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठत त्यांना शुभेच्छा दिला. सुरुवातीला याविषयीची कोणतीही वार्ता समोर आली नाही. पण अचानक ते कलानगरकडे जात असल्याचे समोर आले. जुलै महिन्यात ठाकरे बंधुची ही दुसरी भेट आहे. त्यामुळे जुलै हा राज्यातील राजकारणासाठी कलाटणी देणारा महिना ठरणार का? याची चर्चा रंगली आहे. निमित्त वाढदिवसाचे असले तरी राज्यात चर्चा युतीची होत आहे. राजकारण राज्याला कोणत्या नवीन राजकीय वळणावर नेणारी याची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

जुलैमध्ये दोनदा भेट

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू वरळी डोम येथे 18 वर्षांनी एकत्र आले. 5 जुलै रोजी दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यावेळीच खऱ्या अर्थाने वातावरण निर्मिती झाली होती. त्याला हवा देण्याचे काम असे अधुन मधुन होणार हे या निमित्ताने समोर आले.

भाजपला मराठी आणि ठाकरे ब्रँड संपवायचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, या एकाच रेषेवर सध्या दोन्ही नेत्यांचे मार्गाक्रमण आक्रमकपणे सुरू आहे. 5 जुलै नंतर युतीची चर्चा अंधातंरीच राहते की काय असे वाटत असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिला. या कौटुंबिक सोहळ्यातून एक राजकीय अजेंडा ठरेल का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी

वरळी डोम येथे विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी असे एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. त्यावर राजकीय पंडितांनी ही युतीची भविष्यातील नांदी असल्याचे भाष्य केले होते. आता दोन्ही भावांचे मनोमिलन झाले हे स्पष्ट झाले आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे अनेक अर्थ काढण्यात आले. त्याविषयीचे अर्थ काढण्यात येत आहेत. पण दरम्यान दोन्ही भावांनी वाढदिवसाचा योग साधत महायुतीला एक संदेश दिल्याचे म्हटले जात आहे.

6 वर्षांनी मातोश्रीवर

जानेवारी 2019 मध्ये राज ठाकरे हे त्यांचा मुलगा अमित यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यापूर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी मातोश्रीकडे कधी वाट वळवली नव्हती. पण 5 जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले. या वेळी दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे ही युतीच्या दृष्टीने मोठी घडामोड असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.