AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मी ठाकरे जेव्हा अचानक बॅनर बघून गाडीच्या बाहेर येतात, ‘मातोश्री’बाहेर नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी आज त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाच्या गेटवर येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतलीय.

रश्मी ठाकरे जेव्हा अचानक बॅनर बघून  गाडीच्या बाहेर येतात, 'मातोश्री'बाहेर नेमकं काय घडलं?
| Updated on: Feb 18, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी आज त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या गेटवर येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतलीय. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी काही कार्यकर्ते पुण्याहून आले होते. या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर बॅनरबाजी केलीय. आपण नेहमी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू आणि तेच आपले विठ्ठल आहेत, अशा आशयाचं पोश्टर या कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांना भेट म्हणून दिलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आज सकाळपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमत आहे.

उद्धव ठाकरेंनी आज दुपारी गाडीच्या टपावर चढून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केलं. ठाकरेंच्या भाषणानंतरही मातोश्रीबाहेर कार्यकर्ते जमत आहेत. विशेष म्हणजे आज एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.

युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करण्यात आलीय. “काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत”, अशा आशयाचं पोस्टर मातोश्रीबाहेर झळकलं आहे. मातोश्रीबाहेर पुण्यातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलीय. ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते.

या दरम्यान त्यांनी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. रश्मी यांनी मातोश्रीच्या बाहेर गेटवरच कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एक पोस्टर रश्मी ठाकरे यांना भेट दिलं. त्या पोस्टरवर महत्त्वाचं वक्तव्य लिहिलंय. “ठाकरे परिवार आणि असंख्य शिवसैनिक हेच आमचे पंढरपूर आणि मातोश्री हीच आमची चंद्रभागा, उद्धव साहेब हेच आमचे विठ्ठल”, असं बॅनरवर लिहिलं आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.