AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE : संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांवर वरुण सरदेसाई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युवासेनाचे वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्यांच्या या आरोपांवर वरुण सरदेसाई यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

EXCLUSIVE : संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांवर वरुण सरदेसाई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 03, 2023 | 7:59 PM
Share

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे युवासेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचा काही हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असं धक्कादायक विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नितेश राणे यांच्या आरोपांवर आता वरुण सरदेसाई यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याची माहिती दुपारी मिळाली. कसब्यातील मिळालेल्या विजयाचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी हे केलं जात आहे का? त्यांच्या अंतर्गत कलहातून हे प्रकरण घडलं असावं”, अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली.

“नितेश राणेंच्या आरोपांना भीक घालत नाही. राणेंच्या आरोपांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी , दिवंगत गानसम्राज्ञी लता दीदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नितेश राणे काय बोलले हे सर्वांना माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली.

“मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. मी लपूनछपून काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांना पोलिसांनी पकडावं. कुणी कुणाचं नाव घ्यायची गरज नाही. संदीप देशपांडेंचा माझ्याशी काय संबंध? ज्यांनी हल्ला केला त्यांनी त्यांना पकडावं. शिवाजी पार्कात भाजीवाले आहेत अशी चर्चा”, असा वरुण सरदेसाई यांनी केला.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, या हल्ल्यासंदर्भातील मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजताना दिसला. संदीप देशपांडे यांचा मनसुख हिरेन, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केला आहे. “काही दिवसांपासून संदीप देशपांडे वरुण सरदेसाई नावाच्या व्यक्तीवर सातत्याने आरोप करत आहेत. गेल्या सरकारमध्ये या वरुण सरदेसाईची काय ताकद होती ते आपल्या सर्वांना माहिती आहे. एक कार्यकर्ता जेव्हा विविध विषय महापालिकेत घेत होता त्यानंतर सकाळी त्या कार्यकर्त्यावर हल्ला होतो. वरुण सरदेसाई आणि संबंधित लोकांचं या प्रकरणात सहभाग आहे का याबाबतही चौकशी व्हावी”, असं नितेश राणे आज विधानसभेत म्हणाले.

संदीप देशपांडे यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

संदीप देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. एरवी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र आज ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना माहहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडे यांनीही चांगलाच प्रतिकार केला. हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरीवर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.