पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं अजब विधान; म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अजब विधान केलं आहे. (vijay wadettiwar reaction on pooja chavan suicide case)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं अजब विधान; म्हणाले...
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अजब विधान केलं आहे. ज्यांच्या घरातील व्यक्ती आत्महत्या करते त्यांना चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची गरज नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (vijay wadettiwar reaction on pooja chavan suicide case)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी चर्चा करताना हे विधान केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणी कुणी तरी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. तक्रार करणारे हे तिचे नातेवाईक असले पाहिजेत. तिचं शोषण झालं की नाही? नेमकं काय झालं? हा काय प्रकार आहे? एकूण घटनेचं गांभीर्य काय आहे? हे पाहिलं पाहिजे. तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबाीतील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

राजकीय भूमिका घेऊन प्रतिक्रिया देणं चुकीचं

परंतु, केवळ राजकारणासाठी हा विषय घेऊन जायचं असेल तर मग चौकशी अंती जे होईल सिद्ध होईल ते होईल. त्यानुसार कारवाई होईल, असं सांगत पण या मुद्द्यावर एखाद्याची प्रतिमा खराब करण्यासाठी एखादी राजकीय भूमिका घेऊन वक्तव्य केलं जात असेल तर ते योग्य नाही, ही माझी भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं.

डोक्याला मार लागल्याने मृत्यू

पूजा चव्हाणचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. मात्र 7 फेब्रुवारीला तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.

राठोड अज्ञातवासात?

चित्रा वाघ यांच्या थेट आरोपानंतर प्रसारमाध्यमांनी राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या तीन दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात उभी आहे. त्यामुळे राठोड गाडी सोडून अज्ञातवासात कुठे निघून गेले? असा सवाल केला जात आहे.

नेमकं प्रकरणं काय?

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. (vijay wadettiwar reaction on pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर?; मुख्यमंत्र्यांना दिला पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट!

(vijay wadettiwar reaction on pooja chavan suicide case)

Published On - 2:36 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI