अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांचेही आदेश पाळत नाहीत; विनायक मेटेंचा आरोप

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. (vinayak mete slams again ashok chavan over Maratha reservation)

अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांचेही आदेश पाळत नाहीत; विनायक मेटेंचा आरोप
विनायक मेटे,नेते, शिवसंग्राम

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशही पाळत नसल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. (vinayak mete slams again ashok chavan over Maratha reservation)

विनाय मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणावर येत्या 25 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला याचिकाकर्ते, वकील आणि सीनियर कौन्सिल यांना घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. परंतु, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेशही पाळले नाहीत. पण चव्हाण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन बैठकीला गेले आहेत, असा आरोप मेटे यांनी केला. चव्हाण मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

चव्हाण यांची मराठा आरक्षणाविषयीची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. चव्हाण हे आरक्षणाची भूमिका मांडत आहेत की काँग्रेसची? याचा तपास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली. चव्हाण यांची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. सर्वांना विश्वासात घेऊन नव्याने आरक्षण उपसमिती स्थापन करण्यात यावी अशी आमची मागणी होती. त्याला चव्हाण यांनी हरताळ फासला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (vinayak mete slams again ashok chavan over Maratha reservation)

दरम्यान, काल मुंबईच्या आझाद मैदानात आज मराठा क्रांती मोर्चाची सभा पार पडली. सरकारी नोकरीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय आणि नियमावली, विविध शासन निर्णय याचे चुकीचे अर्थ लावण्यात आलेत. त्यामुळे राज्यातून बेरोजगार युवकांनी केलेल्या भरती पूर्व आरक्षण आणि अनुशेष संदर्भात आढावा घेण्याच्या मागणीवर शासनाने विचार करावा, EWS आरक्षणाच्या माध्यमातून चाललेली दिशाभूल थांबवावी, औरंगाबादचे नामांतर करून तत्काळ “छत्रपती संभाजीनगर” असं करावं, समांतर आरक्षणाच्या प्रशासकीय चुकीने अन्याय झालेल्या मराठा समाजातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. (vinayak mete slams again ashok chavan over Maratha reservation)

संबंधित बातम्या:

… तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

ऑनलाईन नोंदणीशिवाय भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

LIVE | पुण्यातून रिपोर्ट आला, बीडमधील 26 कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच!

(vinayak mete slams again ashok chavan over Maratha reservation)

Published On - 4:43 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI