AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election: लाल बावट्यानेही दिला भगव्याला पाठिंबा; माकपच्या विनोद निकोलेंसह अपक्षांमुळे ‘मविआ’चे पारडे जड

ल्या पाच ते सात वर्षात केंद्रात जे सरकार आहे. त्यांनी कामगार शेतकरी यांच्याविरोधात धोरणं राबविण्यात आली आहेत. त्यामुळे या चुकीच्या धोरणांमुळे आपण महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rajya Sabha Election: लाल बावट्यानेही दिला भगव्याला पाठिंबा; माकपच्या विनोद निकोलेंसह अपक्षांमुळे 'मविआ'चे पारडे जड
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 07, 2022 | 10:35 PM
Share

मुंबईः राज्यसभेच्या (Rajysabha Elecation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला चर्चेचा विषय ठरला आहे ती गोष्ट म्हणजे 12 अपक्ष आमदारांची उपस्थिती. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे 12 अपक्ष आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे आघाडीला जोरदार पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे साहजिकच आता महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले (Marxist Communist Party MLA Vinod Nikole) यांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारला माझा पाठिंबा आहे.

कामगार शेतकरी यांच्याविरोधात धोरणं

गेल्या पाच ते सात वर्षात केंद्रात जे सरकार आहे. त्यांनी कामगार शेतकरी यांच्याविरोधात धोरणं राबविण्यात आली आहेत. त्यामुळे या चुकीच्या धोरणांमुळे आपण महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपकडून जो खासगीकरणाचा सपाटा

तसेच यावेळी पालघरच्या डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले की, मागील वर्षी शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन पुकारले. ते आंदोलन दीर्घ काळ चालले होते, मात्र त्या आंदोलनातील शेतकऱ्यांची केंद्र सरकारने त्यांची फरफट केली. तसेच देशात भाजपकडून जो खासगीकरणाचा सपाटा लावण्यात आला आहे, त्याला विरोध म्हणून मी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचेही आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.

केंद्रातील सरकारने देशात सर्वत्र खासगीकरणाचा घाट घातला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन राज्यसभेला आपण पाठिंबा देत असल्याचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?