AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्यांनी 1 ट्रक माती दिली, पोरांनी 4 किल्ले हुबेहूब बनवले!

विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, विरार: दिवाळीच्या सुट्टीत व्हॉट्सअॅप-फेसबुकसह सोशल मीडियापासून दूर राहात, लहानग्यांना गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी विरारमध्ये अनोखा प्रयोग करण्यात आला. सोसायटीतील मुलांनी सोसायटीतच 4 किल्ले हुबेहूब बनवले. मातीतून साकारलेले हे किल्ले सध्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, विजय दुर्ग आणि प्रतापगड यांच्या हुबेहूब कलाकृती मातीतून साकारल्या आहेत. विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात नाना […]

मोठ्यांनी 1 ट्रक माती दिली, पोरांनी 4 किल्ले हुबेहूब बनवले!
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, विरार: दिवाळीच्या सुट्टीत व्हॉट्सअॅप-फेसबुकसह सोशल मीडियापासून दूर राहात, लहानग्यांना गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी विरारमध्ये अनोखा प्रयोग करण्यात आला. सोसायटीतील मुलांनी सोसायटीतच 4 किल्ले हुबेहूब बनवले. मातीतून साकारलेले हे किल्ले सध्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, विजय दुर्ग आणि प्रतापगड यांच्या हुबेहूब कलाकृती मातीतून साकारल्या आहेत.

विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात नाना नानी पार्क 2 ही सोसायटी आहे. या सोसायटीतील 20 ते 25 मुलांनी दिवाळीच्या सुट्टीत, लहान मुलांना शिवरायांचा इतिहास माहित व्हावा, शिवरायांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांची दुर्गम अवस्था काय असते, किल्ले कसे सर केले असतील, याची जाणीव मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी आपल्याच सोसायटीत 4 किल्ले बनविले आहेत.

सिंधुदुर्ग

स्थानिक नगरसेवक प्रशांत राऊत, बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते स्वप्नील पाटील यांनी या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ट्रक माती उपलब्ध करून दिली. सोसायटीतील लहान मुलं, राहिवाशांनी वेळ काढून रात्री 5 ते 6 दिवस मेहनत करून हे किल्ले बनविले आहेत.

रायगड

या किल्ल्यात  रायगड आहे.  रायगडावरील काही स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये महादरवाजा, टकमक टोक, हिरकणी बुरुज, चीत दरवाजा, बाजारपेठ, होळीचा मॉल दाखविला आहे.  दुसरीकडे सिंधुदुर्ग अणि विजयदुर्ग आणि प्रतापगडही बनवण्यात आला आहे.

रायगड हा किल्ला अक्षय वांद्रे, सिद्धेश घाडीगावकर, अनिकेत साटम, दिवेश बोरकर यांनी बनविला आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला अमित कुळये,प्रशांत जंगम, रमेश देवळेकर यांनी बनविला आहे. तर विजयदुर्ग हा किल्ला जितेंद्र जोंधळे, ध्रुव जोंधळे, हर्षिता धयाळकर यांनी बनविला आहे. प्रतापगड हा किल्ला  महेश देसाई, संतोष गावडे,  सुमित विश्वासराव या मुलांनी बनविला आहे.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.