इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च, दुसऱ्या पत्नीला जीवे मारलं, विरारमध्ये तरुणाला अटक

इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च, दुसऱ्या पत्नीला जीवे मारलं, विरारमध्ये तरुणाला अटक
विरारमध्ये पतीकडून पत्नीची हत्या

विरार पूर्व भागातील गोपचरपाडा भागात राहणाऱ्या 35 वर्षीय अजय हरभजन सिंह याला अटक करण्यात आली आहे. (Virar Husband kills second wife)

अनिश बेंद्रे

|

May 27, 2021 | 2:37 PM

विरार : इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च करुन पत्नीला जीवे मारणाऱ्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. विरार पोलिसांनी 35 वर्षीय तरुणाला अटक केली. मयत महिला आणि आरोपी दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (Virar Husband kills second wife by searching ways to murder on internet)

दोघांचाही दुसरा विवाह

विरार पूर्व भागातील गोपचरपाडा भागात राहणाऱ्या 35 वर्षीय अजय हरभजन सिंह याला अटक करण्यात आली आहे. मयत रुबीचं आधीही लग्न झालं होतं. पहिल्या लग्नातून तिला तीन मुलं आहेत. अजयसोबत दुसरा विवाह झाल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तर आरोपी अजयचंही आधी एक लग्न झालं होतं.

आरोपी रुबीच्या भाचीसोबत पळून गेलेला

रुबी आणि अजय विरारमध्ये राहत असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावरच तिची मोठी बहीण कुटुंबासह राहत होती. धक्कादायक म्हणजे अजय आधी रुबीच्या भाचीसोबत पळून गेला होता. त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अजयला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तो पहिल्या पत्नीसोबत पुन्हा राहू लागला. मात्र तो तिला मारहाण करत असे.

रुबी राहत्या घरी मृतावस्थेत

दरम्यान, रुबीची बहीण मंगळवारी तिच्या घरी पोहोचली, तेव्हा रुबी बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेली तिला आढळली. तिने निरखून पाहिलं असतं रुबीच्या नाका तोंडातून रक्त येत होतं. तिने आपल्या भाऊ-वहिनीला घरी बोलावलं. इतक्यात अजय दुसऱ्या खोलीत खुर्चीवर बसलेला आढळला. त्याला रुबीबद्दल विचारलं असता, त्याने कुठलंच उत्तर न दिल्यामुळे अजयनेच तिचा खून केल्याचा कुटुंबाचा संशय बळावला.

इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च

अजय इंटरनेटवर कुठल्याही व्यक्तीची हत्या कशी करावी, याच्या पद्धती शोधायचा, अशी माहिती रुबीच्या भावाने पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केल्यावर अजयने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करत अजयला बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित बातम्या :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

पत्नीसोबत मित्राचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीने राहत्या घरातच मित्राचा काटा काढला

(Virar Husband kills second wife by searching ways to murder on internet)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें