
Kunbi Caste Certificate : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून त्यानुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. त्यासाठी शासन निर्णय ही काढला. आता गावातील नोंदी आणि शिफारशींआधारे जात प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यासाठी उपोषणाचा श्रीगणेशा केला नाही आणि पाचव्याच दिवशी या लढ्याला यशही आले. आता या प्रक्रिये आधारे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल.
कुणबी जात प्रमाणपत्र प्रक्रिया
राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रक्रिया पण सुरू झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्य़ांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यासाठी जीआरमध्ये काही निकष देण्यात आले आहेत. अर्जदाराला विहित पद्धतीने अर्ज करता येईल. त्याआधारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
कुठे मिळेल अर्ज?
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदारांना आपलं सरकार पोर्टल उघडावं लागेल. aaplesarkar.mahaonline.gov.in यावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्जातील तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ते त्यासोबत कागदपत्र जोडावी लागतील. तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज आणि कागदपत्रं जमा करावी लागतील.
ही कागदपत्रं विसरू नका
पुढील प्रक्रिया काय?
अर्ज आणि संबंधित कागदपत्रं दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक चौकशी होईल. तहसली कार्यालयातून ही चौकशी होईल. माहितीचा पडताळा झाल्यानंतर याविषयीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. माहितीत विसंगती आढळल्यास अर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
तक्रारीसाठी कक्ष सुरू करा
गेल्यावर्षी जूनपर्यंत छत्रपती संभाजीनगर :- 10744 2) जालना :- 10014 3) परभणी :- 9374 4) हिंगोली :- 4719 5) बीड :- 90946 (सर्वाधिक) 6)नांदेड :- 2760 7) लातूर :- 1745 (सर्वात कमी) 8 ) धाराशिव :- 9654 असं कुणबी प्रमाणपत्र वाटप झालं होतं. पण या दरम्यान अनेकांचे अर्ज पैशांची मागणी करत प्रशासनातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी अडवून ठेवले. याविषयीची तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केली आहे. त्यामुळे मराठा समाजातील अनेक अर्जदारांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी कक्ष तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच अर्ज केल्यानंतर एका विहित मुदतीत कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.