AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशिमच्या कॅन्सरग्रस्त चिमुकलीचा मुंबईत लोकलमधून पडून मृत्यू

वाशिमहून कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबईत आलेल्या चार वर्षांच्या नेहाचा चेंबुरमध्ये गर्दीने भरलेल्या लोकलमधून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला.

वाशिमच्या कॅन्सरग्रस्त चिमुकलीचा मुंबईत लोकलमधून पडून मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Sep 16, 2019 | 11:30 AM
Share

मुंबई : चार वर्षांच्या चिमुरडीच्या इच्छाशक्तीपुढे कॅन्सरने हात टेकले, मात्र नियतीला तिच्या आयुष्याची बळकट होणारी दोर पाहवली नाही. कर्करोगाच्या उपचारांसाठी वाशिमहून मुंबईत आलेल्या चिमुकलीचा (Washim Girl Dies in Accident) लोकलमधून खाली पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

मूळ वाशिमच्या असलेल्या चार वर्षांच्या नेहा ठगे हिला काही महिन्यांपूर्वीच कर्करोगाचं निदान झालं होतं. केमोथेरपीसारख्या उपचारांसाठी नेहाच्या पालकांनी तिला घेऊन मुंबई गाठली. ठणठणीत बरं होऊन विदर्भातील आपल्या छोट्याशा गावी परत जाऊ, या आशेने नेहा सर्व उपचार निमूटपणे सहन करत होती.

गेल्या आठवड्यात नेहाचे आई-वडील विदर्भात परतले, मात्र त्यांच्या काळजाचा तुकडा काळाने हिरावून नेला होता. चेंबुरमध्ये गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नेहाचा उपचारांदरम्यान मृत्यू (Washim Girl Dies in Accident) झाला.

नेहाचा जन्म वाशिममध्ये झाला होता. तिला सहा आणि एक वर्षांची भावंडं आहेत. तिचे वडील रोजंदारीवर काम करत होते. वर्षाच्या सुरुवातीला नेहा पाय आणि पोटात अतीव वेदना होत असल्याचं सांगत होती. वाशिममधील दवाखान्यात निदान होऊ न शकल्यामुळे तिला परळमधील केईएम रुग्णालयात आणण्यात आलं.

नेहाच्या पोटात ट्यूमर असल्याचं समोर आलं आणि तिच्या आई-वडिलांच्या पोटात गोळाच आला. नेहा आणि तिचे आई-वडील गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होते. सुरुवातीला रस्त्याच्या कडेला राहून ते गुजराण करत होते. मात्र एका एनजीओने त्यांना चेंबुरमध्ये तात्पुरता आसरा दिला.

मुंबईच्या लोकल रेल्वेवर दररोज 75 लाख प्रवाशांचा ताण, वर्षाला हजारो मृत्यू

नेहा केमोथेरपीला चांगला प्रतिसाद देत होती. नेहाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. सुरुवातीला ज्या हालचाली करण्यास तिला त्रास होत होते, त्या सर्व नेहा करायला लागली होती. अगदी चालणं, खेळणं, स्वतःच खाणं अशा सगळ्या हालचाली.

नेहा आणि तिचे आई वडील दररोज मोनोरेलने चेंबुरहून आंबेडकर नगरला यायचे. बारा तासाच्या अंतराने नेहाला इंजेक्शन दिली जात असल्यामुळे दिवसभर त्यांना परिसरातच राहावं लागत असे. मात्र दररोज मोनोचा खर्च परवडेनासा झाल्यामुळे त्यांनी इतर स्वस्त पर्याय शोधण्याचं ठरवलं.

लोकलने चेंबुरहून शिवडी गाठायचं. तिथून शेअर टॅक्सीने टाटा हॉस्पिटला असा त्यांचा नित्यक्रम ठरला. दहा दिवस नेहाचे आई-वडील हा प्रवास करत होते. कोणत्या डब्यात चढायचं, हे पत्नीला सांगून सात तारखेला नेहाचे वडील वाशिमला परतले. पैशांची सोय करण्यासाठी गावी परतण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

आठ तारखेला सकाळी साडेआठ वाजता नेहा आणि तिची आई लोकल पकडण्यासाठी चेंबुर स्टेशनवर आल्या. गर्दीमुळे त्यांनी दोन लोकल सोडल्या. हॉस्पिटलला पोहचण्यासाठी उशिर होत असल्यामुळे अखेर गर्दीत रेटत दोघी ट्रेनमध्ये चढल्या.

नेहाला कडेवर घेऊन तिची आई दरवाजात लोंबकळत होती. मात्र गर्दी असह्य झाल्याने तिचा हात सुटला आणि मायलेकी धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर कोसळल्या. नेहाच्या नाका-तोंडातून रक्त यायला लागलं. तिचे खांदे आणि ढोपरंही फुटली होती. तर तिच्या आईचा डोळा सुजला होता.

पोलिसांनी तात्काळ दोघींना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर दोघींना केईएममध्ये हलवण्यात आलं. नेहाला आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान नेहाचा मृत्यू झाला.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.