AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना रोखण्याचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार; दिल्लीच्या प्रतिनिधींकडून ‘वॉर्ड वॉर रुम’, जम्बो रुग्णालयांची पाहणी

मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती. मुंबईच मॉडलचा अभ्यास का करत नाही?, असा सवालही कोर्टाने दिल्ली सरकारला केला होता. त्यानंतर दिल्ली सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आलं होतं.

कोरोना रोखण्याचं 'मुंबई मॉडल' दिल्लीत राबवणार; दिल्लीच्या प्रतिनिधींकडून 'वॉर्ड वॉर रुम', जम्बो रुग्णालयांची पाहणी
bmc
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 6:11 PM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामांची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती. मुंबईच मॉडलचा अभ्यास का करत नाही?, असा सवालही कोर्टाने दिल्ली सरकारला केला होता. त्यानंतर दिल्ली सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आलं होतं. या प्रतिनिधी मंडळाने मुंबईतील ‘वॉर्ड वॉर रुम’, जम्बो रुग्णालयांची पाहणी केली. तसेच सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार असल्याचं या प्रतिनिधी मंडळाने स्पष्ट केलं. (we can replicate Mumbai model in delhi)

दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला होता. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी एका विशेष बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा केली. यावेळी काकाणी यांनी कोविड रोखण्यासाठी पालिकेने राबविलेल्या उपाययोजनांची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

या दौऱ्यामध्ये दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल आणि डॉ. धर्मेन्द्र कुमार यांचा प्रामुख्याने समावेश असणाऱ्या चमूने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान महानगरपालिकेने केलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीची माहिती घेतली. या अंतर्गत प्रामुख्याने ‘वॉर्ड वॉर रुम’च्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबविले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जम्बो रुग्णालयांची माहिती घेतली. या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाला आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तिथे करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी या प्रतिनिधींनी महानगरपालिकेने केलेले कार्य अनुकरणीय असून दिल्लीत देखील लवकरच ‘मुंबई मॉडेल’ राबविण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.

वॉर्ड वॉर रुमचे कामकाज घेतले समजावून

दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पालिका करीत असलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन आणि ‘बेड अलॉटमेंट’ समजावून घेण्यासाठी ‘डी’ व ‘के पूर्व’ या दोन विभागांच्या नियंत्रण कक्षांना भेट दिली. ज्या व्यक्तींना कोविड बाधा झाली आहे, त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल हे सर्वप्रथम महापालिकेच्या ‘वॉर रुम’ कडे प्राप्त होतात. त्यानंतर रुग्णांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला जातो व त्यांचे प्राथमिक समुपदेशन देखील केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेचा चमू सदर व्यक्तीच्या घरी जाऊन आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करतो. या दरम्यान सदर रुग्णास रुग्णालयात दाखल करणे, वैद्यकीय उपचार गरजेचे असल्यास रुग्णाला त्याच्या गरजेनुसार खासगी वा सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले जाते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलपणे व वेळेत करण्यात येत असल्याचे पाहून दिल्लीचं हे प्रतिनिधी मंडळ भारावून गेलं.

ऑक्सिजन व्यवस्थापन

पालिकेच्या अखत्यारीतील 1 हजार 800 खाटांच्या ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात 18 मॅट्रिक टन ‘ऑक्सिजन’ पुरेसा असतो. मात्र खाटां तेवढीच संख्या असणाऱ्या 1 हजार 800 ‘बेड’च्या दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील एका रुग्णालयात दररोज 32 मॅट्रिक टन ‘ऑक्सिजन’ लागतो. पालिकेने ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करून प्रभावी रुग्णसेवा कशी साध्य केली आहे, याबाबतची माहिती देखील दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली. विशेष म्हणजे या प्रतिनिधीमंडळाने प्रत्येक माहिती स्वत: रुग्णालयात जाऊन घेतली.

जम्बो कोविड रुग्णालये

कोविड बाधित रुग्णांना परिणामकारक औषध उपचार मिळावेत म्हणून पालिकेने अत्यंत अल्प कालावधीत तात्पुरत्या स्वरूपातील 6 जम्बो कोविड रुग्णालयांची उभारणी केली. या सहा रुग्णालयांमध्ये तब्बल 8 हजार 915 खाटा असून 4 हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ या ठिकाणी अव्याहतपणे कार्यरत आहे. या रुग्णालयांच्या उभारणीबाबत व व्यवस्थापनाबाबत दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना अत्यंत औत्सुक्य होते. या अनुषंगाने त्यांनी गोरेगाव परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्राच्या जागेत महापालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयास भेट दिली. तिथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा आणि करण्यात येत असलेली विविधस्तरीय उपाययोजनांची त्यांनी तपशीलवार माहिती घेतली. तसेच सदर ठिकाणी असणारे ‘डायलिसिस बेड’, ‘आयसीयू बेड’ आणि ‘ऑक्सिजन बेड’ याबाबतही त्यांनी तपशीलवार माहिती जाणून घेतली. यावेळी या प्रतिनिधींनी मुंबईच्या धर्तीवर दिल्लीमध्ये देखील जंबो रुग्णालये उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं.

खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटांचे वितरण महापालिकेकडे

मुंबईतील सर्व खाजगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सर्व खाटा आणि इतर खाटांपैकी 80 टक्के खाटांचे वितरण पालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारेच करण्यात येते. या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनी देखील या व्यवस्थेत सकारात्मक व सक्रिय योगदान दिल्याचे पाहून आपण भारावून गेलो आहोत, अशा भावनाही या प्रतिनिधींनी अभ्यास दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्या. (we can replicate Mumbai model in delhi)

संबंधित बातम्या:

Mumbai Rains Live: नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला, पालघरमध्ये रस्ता वाहून गेला

Mumbai Rains : मुंबई आज रेड तर पुढील 4 दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट; मुख्यमंत्री तातडीने आपत्ती निवारण कक्षात

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापूर ग्रामीण भागातील 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

(we can replicate Mumbai model in delhi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.