Power grid failure | पॉवर ग्रीड फेल्युअर म्हणजे काय? भारतात किती पॉवर ग्रीड? वाचा सर्व काही

मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याची माहिती आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:35 AM, 12 Oct 2020
Power grid failure | पॉवर ग्रीड फेल्युअर म्हणजे काय? भारतात किती पॉवर ग्रीड? वाचा सर्व काही

मुंबई : मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली आहे. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याची माहिती आहे.  (What is grid failure how many grids in India )

पॉवर ग्रीड म्हणजे काय ? 

ग्रीड म्हणजे वीज निर्मिती केंद्रापासून ते वीज वाहिन्यांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा होय. भारतात वीज निर्मितीसाठी जलविद्युत, औष्णिक वीज, अणू उर्जा आणि पवन उर्जेद्वारे वीज निर्मिती केली जाते. त्या केंद्रापासून उच्चदाब वीज वाहक तारांद्वारे विविध वीज केंद्र, उपकेंद्रांद्वारे वीज मोठ मोठया कंपन्या आणि ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते.

ग्रीडच्या कार्यासाठी वीज उत्पादन आणि मागणीमध्ये संतुलन गरजेचे

वीज निर्मिती केंद्रातून निर्माण होणारी वीज आणि  ग्राहकांची मागणी याच्यामध्ये सातत्यानं समन्वय राखण्याची आवश्यक असते.  ज्या प्रमाणात वीज निर्मिती होते त्या प्रमाणात विजेचा वापर होणं गरजेचे असते. यामुळे अभियंत्यांना 24X 7 वीज उत्पादन आणि वीज पुरवठा याच्यामध्ये संतुलन राखावे लागते.

पॉवर ग्रीड फेल

पॉवर ग्रीडचे कार्य सुरू ठेवण्यासाठी आपल्या देशात पॉवर ट्रान्समिशन 50 हर्ट्झ सेट केलेले आहे. यामध्ये 0.5 हर्ट्झ पर्यंतची कपात केली जाऊ शकते. हे कमी-अधिक प्रमाणात झाल्यास, ग्रीड फेल होते आणि ग्रीडसोबत जोडले गेलेल्या भागातील वीज पुरवठा खंडित होतो.

भारतात एकूण 5 ग्रिड

भारतातील पॉवर ग्रीड 5 विभागात आहेत.  उत्तर , पूर्व, उत्तर पूर्व, दक्षिण, पश्चिम असे पॉवर ग्रीड आहेत.

उत्तर :पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि चंदीगड

पूर्व ग्रीड: पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा आणि सिक्कीम

उत्तर पूर्व : अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा

दक्षिण : तेलंगाणा, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पाँडिचेरी

पश्चिम : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा

भारतात यापूर्वी 2 वेळा ग्रीड फेल्युअर

भारतात यापूर्वी भारतात दोन वेळा ग्रीड फेल्युअर झाले आहे. 2 जानेवारी 2001 आणि 30, 31 जुलै 2012 या दिवशी ग्रीड फेल्युअर झाले होते.

दरम्यान,  एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी ग्रीड फेल्युअर होण्याची भीती व्यक्त केली गेली होती.

संबंधित बातम्या  : 

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

(what is grid failure how many grids in india )