बाळासाहेबांच्या खोलीत शाहांनी कोणता शब्द दिलेला? उद्धव ठाकरेंचा Tv9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा

मातोश्रीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय बोलणं झालं होतं. अडीच-अडीच मुख्यमंत्रीपदाबाबत नेमकी काय चर्चा झाली होती याबाबत उद्धव ठाकरेंनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

बाळासाहेबांच्या खोलीत शाहांनी कोणता शब्द दिलेला? उद्धव ठाकरेंचा Tv9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा
Amit Shah Balasaheb Thackeray Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 6:40 PM

राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर राजकीय सत्तानाट्य अवघ्या देशाने पाहिलं. शिवसेना-भाजप यांची युती तुटली, महाविकास आघाडीची स्थापन केलेलं सरकार त्यानंतर शिवसेनेतील बंड आणि पुन्हा भाजप आणि बंड केलेल्या सेना-भाजपची सत्ता. काही दिवसांनी राष्ट्रवादीतून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. मात्र सुरूवात झाली ती म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या शब्दावरून, अमित शाहांनी आपण असा काही शब्द दिला नसल्याचं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे अजुनही या दाव्यावर ठाम आहेत. त्यावेळी खोलीत नेमकं काय घडलं होतं? याबाबत उद्धव ठाकरे यांनी टाव्ही 9 मराठीला दिलेल्या महामुलाखतीतमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

2014 आणि 2019 ला त्या मुद्द्यावर येतो. जी मोदींनी सांगितलेली कोणती गोष्ट पूर्ण केली? अच्छे दिन आले.. नाही, महागाई कमी झाली. नाही, 15 लाख आले? नाही. मग कोण खोटं बोलतंय हे लोकांना कळतंय ना. बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द हा जुमला होता. मी शिवाजी पार्कवर आई वडिलांची शपथ घेतली. मी तुळजाभवानीची ही शपथ घेतली. खोटं का बोलतं आहेत. हे लोकांना कळेल पाच वर्षात आधी तुमचा मुख्यमंत्री नंतर माझा होईल. आधी त्यांचा होणार होता. त्यामुळे मी सभेत बोलत नाही. ज्यावेळी मी बघत होतो. बाळासाहेबांची प्रकृती खालावत चालली आहे. मी मुलगा म्हणून त्यांना वचन दिलं की शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेल. बाळासाहेबांना आपण जे उभं केलं त्याचं काय होईल असं वाटत असेल म्हणून मी त्यांना वचन दिलं. माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना जशीच्या तशी पुढे नेईन सांगितलं. हे मी अमित शाह यांना हे सर्व सांगितलं. तेव्हा ते म्हणाले ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. मी म्हणालो असं करू नका. कृपा करून. कारण आपल्यातच पाडापाडी होईल. आपण क्लिअरकट अंडरस्टँडिंग करू. अडीच वर्ष तुमची असतील मला काही हरकत नाही. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेला दिली तर आपण पत्र तयार करू, त्या पत्रावर पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल. शिवसेना जो मुख्यमंत्री असेल त्याची सही असेल. आणि वर मसुद्यात शिवसेना मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल असं लिहू. ते पत्र तुम्ही होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारावर लावा, असं ठाकरेंनी सांगितलं.

जर अडीच वर्ष पहिली आम्हाला दिली तर आता हे ठरलं होतं. ते म्हणाले, ठिक आहे. आपण एक दुसऱ्याला सांभाळू. त्यानंतर आम्ही पीसीला गेलो. तेव्हा लोकसभेला एक दोन ते तीन महिने बाकी होते. विधानसभा चार पाच महिन्याने येणार होती. आताच मुख्यमंत्रीपद जाहीर करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषदेत सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या समसमान वाटप होईल. आता मुख्यमंत्री हे या पदात येतं. मुख्यमंत्री हे जबाबदारीचं पद येतं. आता ज्याला समसमान याचा अर्थ कळतो त्याला तो कळल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.