बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करुन तिसरा आरोपी कुठे-कुठे पळाला? तपासातून महत्त्वाची माहिती उघड

बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. तर तिसरा आरोपी फरार झाला. हा फरार आरोपी कुठून कसा पळाला, याची देखील माहिती आता तपासात समोर आली आहे. पोलिसांची वेगवेगळी पथकं त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करुन तिसरा आरोपी कुठे-कुठे पळाला? तपासातून महत्त्वाची माहिती उघड
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 8:46 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप अशा दोन आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. तर तिसरा आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता तिसऱ्या आरोपीचं नाव समोर आलं. शिवकुमार उर्फ शिव गौतम असं तिसऱ्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी पोलिसांच्या हातून निसटला. पण तो गोळीबारानंतर कुठे-कुठे आणि कसा गेला? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील आणखी चौथ्या आरोपीचं नाव समोर आलं आहे. चौथ्या आरोपीचे नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान, तिसरा आरोपी कुठून कसा पळाला? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्धीकी यांची हत्या करून पळालेल्या आरोपी शिवानंद शेवटी पनवेलमध्ये दिसून आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा आरोपी ज्या-ज्या मार्गाने पळाला त्या-त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. आरोपीने वांद्रेहून रिक्षाने कुर्ला स्थानक गाठले. कुर्लाहून हार्बर ट्रेन पकडून आरोपी पनवेल स्थानकावर गेल्याचे तपासात समोर आले. सीसीटीव्हीचा माग काढत पोलिसांना तो शेवटी पनवेलमधील सीसीटीव्हीत आढळून आला आहे. पनवेलहून आरोपी एक्सप्रेसच्या मदतीने राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींच्या शोधासाठी उज्जैन (मध्यप्रदेश), हरियाणा, यूपी, दिल्ली या ठिकाणी गुन्हे शाखेची पथक गेली आहेत.

गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा चौथा आरोपी हा तीनही आरोपींना हँडल करत होता. हे चारही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजल्याची माहिती आहे. कारण हे चारही आरोपी कत्तर जेलमध्येच बिश्नोई गँगच्या संपर्कात आले होते. त्यावेळी हत्येनंतर आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घ्यायचं असं ठरलं होतं.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.