Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2024 च्या आखाड्यात 2019 च्या निकालावरुन वाद-प्रतिवाद, कुणी कुणाच्या जागा पाडल्या?, पाहा व्हिडीओ
2024 च्या आखाड्यात 2019 च्या निकालावरुन वाद-प्रतिवाद सुरुय. 2019 ला मतविभाजनामुळे वंचितचा भाजपला 8 जागांवर फायदा झाल्याचा प्रश्न आंबेडकरांना केला गेला., यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्या ८ जागांवर वंचितचा पराभव झाल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. गेल्यावेळी लोकसभेत आघाडी न झाल्यामुळे वंचितचा फायदा भाजपला झाल्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना केला गेला. त्यावर वंचितने नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीनंच आमच्या जागा पाडल्याचं उत्तर आंबेडकरांनी दिलं. 2019 च्या लोकसभेत कोणत्या जागा काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या पराभूत झाल्या. वंचितचा त्या जागांवर काय रोल होता. पाहा स्पेशल रिपोर्ट.

गडचिरोली-चिमूर लोकसभा भाजपचे अशोक नेते जिंकले. काँग्रेसचा 77 हजार 526 मतांनी पराभव झाला. वंचितला इथं 1 लाख 11 हजार मतं होती. सांगली लोकसभा भाजपचे संजयकाका पाटील जिंकले. आघाडीचा 1 लाख 64 हजार मतांनी पराभव झाला. वंचितच्या गोपीचंद पडळकरांना 3 लाख मतं मिळाली. नांदेड लोकसभा भाजपचे प्रतापराव चिखलीकर जिंकले. काँग्रेस ४० हजार मतांनी पराभूत झाली. वंचितला इथं १ लाख 66 हजार मतदान झालं. सोलापूर लोकसभा भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी जिंकले. काँग्रेसचा 1 लाख 58 हजार मतांनी पराभव झाला. वंचितला इथं 1 लाख 70 हजार मतं मिळाली
बुलडाणा लोकसभा शिवसेनेचे प्रतापराव जाधव जिंकले. राष्ट्रवादीचा 1 लाख 33 हजारांनी पराभव झाला. वंचितनं इथं 1 लाख 72 हजार 627 मतं घेतली. हातकणंगले लोकसभा शिवसेनेचे धैर्यशील माने जिंकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 96 हजारांनी पराभव झाला. वंचितला इथं 1 लाख 23 हजार मतं मिळाली
लोकसभेत तब्बल 6 ते 8 जागा अश्या होत्या. जिथं उमेदवार जितक्या मतांनी पडले वा जिंकले त्याहून जवळपास दुप्पट किंवा सरासरी १५ हजार जास्त मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली. आकड्यांच्या हिशेबानं बघायचं झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. लोकसभेनंतर 2019 च्या विधानसभेतही वंचितची आघाडी झाली नाही. युतीविरोधात आघाडीच्या जवळपास २५ ते ३० जागा अशा होत्या, जिथं वंचितच्या मतांमुळे गणितं फिरली.
चाळीसगावात भाजप जिंकली, राष्ट्रवादीचा 3,998 पराभव झाला. वंचितला 38 हजार 361 मतं मिळाली. बुलढाण्यात शिवसेनेचा विजय झाला. काँग्रेसचा 36 हजारानं पराभव, वंचितला 41 हजार 173 मतं मिळाली. चिखलीत भाजपचा विजय झाला., काँग्रेसचा 6688 मतांनी पराभव, वंचितला 9605 मतं मिळाली. खामगावात भाजप विजयी झाली. काँग्रेसचा 16700 मतांनी पराभव, वंचितला इथं 25 हजारांहून जास्त मतं मिळाली. अकोटमध्ये भाजपचा विजय झाला. काँग्रेस 20700 मतांनी पराभूत वंचितला 41 हजार मतं मिळाली.
अकोला पश्चिममध्ये भाजपचे आमदार जिंकले.काँग्रेस 2838 मतांनी पराभूत वंचितला २० हजार मतं मिळाली. धामणगाव विधानसभेत भाजपचा विजय झाला. काँग्रेस 9415 मतांनी पराभूत वंचितला 23 हजार 700 मतं नागपूर दक्षिण विधानसभेत भाजप विजयी काँग्रेस 3987 मतांनी पराभूत वंचितला 5535 मतं. बल्लापूर विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेस 33 हजारानं पराभूत. वंचितला मतं 39 हजार 779. चिमूर विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेस 9706 मतांनी पराभूत. वंचितला मतं 24 हजार 384. राळेगाव विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेस 9824 मतांनी पराभूत. वंचितला 10 हजार 682 मतं.
यवतमाळ विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेसचा 2626 मतांनी पराभव. वंचितला 7812 मतं. अर्णी विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेसचा 3169 मतांनी पराभव. वंचितला 12 हजार 253 मतं. नांदेड उत्तरमध्ये शिवसेना विजयी. काँग्रेसचा 12 हजार 18 मतांनी पराभव. वंचितला 26 हजार 376 मतं. जिंतूर विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेसचा 3549 मतांनी पराभव. वंचितला 13 हजा 107 मतं. फुलंब्री विधानसभेत भाजप विजयी. काँग्रेसचा 15195 मतांनी पराभव. वंचितला 15 हजार 199 मतं. पैठण विधानसभेत शिवसेना विजयी. राष्ट्रवादीचा 14 हजार 74 मतांनी पराभव. वंचितला 20 हजार 564 मतं. उल्हासनगर विधानसभेत भाजप विजयी. राष्ट्रवादीचा 1946 मतांनी पराभव. वंचितला 5 हजार 677 मतं.
अशा अनेक विधानसभांमध्ये वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला होता. ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान होऊन भाजपला फायदा झाला. मात्र कुणामुळे कोण पराभूत झालं, यावरुन वाद सुरु आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणतायत की वंचित स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा महायुतीला होणार. तर दुसरीकडे मत विभाजनावरुन वंचित आणि काँग्रेसनं एकमेकांकडे बोट दाखवलंय. यावेळी वंचितनं मविआला सुरुवातीला 27 जागांचा प्रस्ताव दिला होता. नंतर तो प्रस्ताव आहे की मागणी यावरुन बराच खल रंगला.
वंचितचे पदाधिकारी आमची मागणी असल्याचंही म्हणाले आणि नंतर मागणी नसून 27 जागांवर तयारी केल्याचा प्रस्ताव असल्याचंही सांगितलं. 2019 च्या विधानसभेवेळीही वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरु होती. तेव्हा वंचितनं 288 विधानसभांपैकी फक्त 40 जागा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडणार. उर्वरित 248 जागांवर आम्ही लढणार असल्याचं सांगितलं. चर्चेच्या या टप्प्यात काँग्रेसला आम्ही जागा देणार असं म्हणत वंचितनं उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा अवधी दिला. वंचितच्या या प्रस्तावावरुनच आघाडीची शक्यता धूसर झाली होती. मात्र नंतर ते एक राजकीय स्टेटमेंट होतं, असं उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं.
