VIDEO: ओबीसी समाज मुस्लिम धर्म स्वीकारणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

VIDEO: ओबीसी समाज मुस्लिम धर्म स्वीकारणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
prakash ambedkar

ओबीसींच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात टोलवाटोलवीचं राजकारण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

गिरीश गायकवाड

| Edited By: भीमराव गवळी

Dec 13, 2021 | 12:09 PM

मुंबई: ओबीसींच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात टोलवाटोलवीचं राजकारण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत ते मुस्लिम धर्म स्विकारत नाही तोपर्यंत धर्माल कोणताही धोका नाही. त्यामुळे माझा प्रश्न आहे की ओबसी मुस्लिम धर्म स्वीकारणार का?, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे राज्यात नवं राजकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही 9 मराठीशी खास संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जोपर्यंत ओबीसी मुस्लिम धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत त्यांची आर्थिक उन्नती होणार नाही. ओबीसींनी आपल्या आर्थिक उन्नतीकडे आणि सामाजिक प्रतिष्ठेकडे लक्ष दिलं पाहिजे. ते द्यायचं असेल तर त्यांना या धर्मांध पक्षाच्या बाहेर पडावे लागेल. ज्या पक्षांना ते आपलं मानत आहेत, त्या पक्षांना सोडून स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करावा लागेल, असं सांगतानाच ओबीसी हे मुस्लिम धर्म स्वीकारणार नाहीत हे शंभर टक्के सर्वांना माहीत आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं. माझा प्रश्न की ओबीसी समाज हा मुस्लिम धर्म स्विकारणार का? मुस्लिम हा १५ टक्के आहेत. सर्व पदे हे हिंदू समाजाने व्यापलेली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ओबीसींना वंचितशिवाय पर्याय नाही

ओबीसींना वंचित शिवाय दुसरा पर्यायच नाही. वंचित हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष आहे. आरक्षण हे विकासाचं सर्वात मोठं साधन असल्याचं आम्ही मानतो. आरक्षण हे प्रतिनिधीत्व देण्याचं एक हत्यार आहे, असं आमचं मत आहे. त्यामुळे ओबीसींनी त्यावर विचार केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. राज्यातील कोणताच पक्ष ओबीसींच्या बाजून नाही. गेल्या 20 वर्षात ओबीसींचा आर्थिक विकास काय झाला? हे ओबीसींनीच पाहावं आणि त्यांनीच भूमिका घ्यावी, असंही ते म्हणाले.

निवडणुकीची तयारी काय आहे?

आज सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचा अर्ज आहे. जुनं आरक्षण लागू होऊ द्या. नाहीतर पूर्ण निवडणुक पुढे ढकला ही पिटीशन आहे. निकाल लागेल. निकाल लागला तरी देखील निवडणुकांबद्दल तयारी काय आहे हा महत्वाचा मुद्दा आहे, असं त्यांनी सांगितलं.

भुजबळांनी ओबीसींसाठी काय केले?

छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणाबाबत बोलू नये. 90 साली ते कोणत्या पक्षात होते. ते पूर्वी धर्मांध राजकारणात होते. मंडल कमिशनला विरोध करणाऱ्यांच्या पक्षात होते, असं सांगतानाच भुजबळांनी ओबीसींसाठी काय केले ते सांगावं हे माझं त्यांना आव्हान आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

ओवैसींनी खुलासा करावा

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी 5 टक्के मुस्लिम आरक्षणावर भाष्य केलं नाही. मराठा आरक्षण देताना सुप्रीम केर्टाने मुस्लिम आरक्षण अबाधित ठेवलं, मग आरक्षण देत का नाहीत याचा खुलासा ओवैसींनी करावा, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Kashi Vishwanath Corridor: कालभैरव मंदिरात मोदींच्या हस्ते आरती, थोड्याच वेळात काशी विश्ववनाथ धामचं लोकार्पण

Sanjay Raut: ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात: संजय राऊत

Bhavya Kashi, Divya Kashi: भाजपचा राज्यभरात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ कार्यक्रम; फडणवीस, पाटील, मुंडे सहभागी होणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें