AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उरलीसुरली सेना पण हायजॅक होणार? राज-उद्धव युतीचा फायदा कुणाला? काय आहे राजकीय विश्लेषकांचा तो दावा, तुम्ही वाचला का?

Raj Thackeray -Udhav Thackeray : तर राज्याच्या राजकारणात ते अवघड वळण एकदाचं आलं. दोघे एकत्र येणार नाहीत, हे दावे पुसत दोन ठाकरे एका मंचावर आलेत. मराठी भाषेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. या घडामोडीनंतर राज्यात उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहेत. यातून कुणाच्या पदरात नेमकं काय पडणार?

उरलीसुरली सेना पण हायजॅक होणार? राज-उद्धव युतीचा फायदा कुणाला? काय आहे राजकीय विश्लेषकांचा तो दावा, तुम्ही वाचला का?
राज ठाकरे, उद्धव ठाकरेImage Credit source: गुगल
Updated on: Jul 05, 2025 | 4:45 PM
Share

दोन ठाकरे अखेर एका मंचावर आले. मराठी भाषेच्या मुद्यावर मनसे आणि उद्धव सेना 18 वर्षांनी एकत्र आली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हे मनोमिलन असंच कायम राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. आज काँग्रेसची अनुपस्थिति प्रकर्षाने जाणवली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची युतीविषयीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आजच्या मेळाव्यातून नेमकं कुणाला काय साध्य होणार आहे हे भविष्याच्या उदरात दडलेले आहे. पण राज्यात नवीन राजकीय पर्वाला सुरूवात झाली हे नक्की आहे. राज्यातील या नवीन घडामोडींवर राजकीय विश्लेषकांनी मतं मांडलं आहे. त्यांनी काही ठोकताळे मांडले आणि अंदाज वर्तवले आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर आले. त्यांनी फडणवीस सरकारवर भाषिक धोरणावरून टीकास्त्र सोडले. त्यात राज ठाकरे यांनी मुद्देसुद भाषण केले. पण हातचे राखून ते बोलले अशी चर्चा होत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी टीकेची धार कमी केलेली नाही हे दिसून आले. याविषयी राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आणि संजय वरकड यांनी भूमिका मांडली आहे.

आघाडीत ‘बिघाडी’?

आघाडीत, आज काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. ते आज मेळाव्यात सहभागी झालेच नाहीत. काँग्रेसने काढता पाय घेतलाच आहे. आघाडीत बिघाडी सुरू झालेली आहे, असे मत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी मांडले. शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचे मनोमिलन होत की काय, हे अजून कळलेलं नाही. पण येत्या निवडणुकीत ही आघाडी राहणार नाही.

तर राजकीय विश्लेषक संजय वरकड यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे. काँग्रेसने आजच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जशी तडजोड केली, तशी राज ठाकरे करणार नाहीत. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यात याविषयीची अट असेल. राज्यात सध्या कुठल्याही मोठ्या निवडणुकी नाहीत. महापालिका निवडणुकीचा विषय घेतला तर राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला महाविकास आघाडी विखुरल्याचे मत त्यांनी मांडले.

मनसेला बळ मिळेल

मराठवाडा आणि विदर्भात मनसेचे अस्तित्व नाही. पण दोघे एकत्र आले तर या भागात मनसेला निश्चितच बळ मिळेल. मनसेची बाजू उजवी राहील. तर शिवसेनेला सुद्धा मरगळ झटकून कामाला लागेल. जय गुजरात म्हटल्याचा परिणाम निश्चितच शिंदे गटावर होईल, असे उन्हाळे म्हणाले. ठाकरे एकत्र आल्याने या पट्ट्यामध्ये शिंदे गटाची पिछेहाट होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला.

आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा पिंजून काढला आहे. त्यांनी खेडोपाडी प्रवास केलेला आहे. त्यांचे नेतृत्व आता सिद्ध झालेले आहे. तर अमित ठाकरे अस्तित्व तयार करू पाहत आहे. या युतीचा तरुण पिढीला होईल. मराठवाड्यात, विदर्भात बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यादृष्टीने जो पक्ष काम करेल, त्याला फायदा होईल, असे मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.

उरलेली शिवसेना हायजॅक होईल?

उद्धव ठाकरे यांनी राजकारणात पाऊल टाकलेले नव्हते. तर राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे तडाखेबंद भाषण करत होते. त्यानंतर आता 20 वर्षांचा मोठा काळ लोटलेला आहे. या काळात उद्धव ठाकरे यांनी अनेक संकटांना तोंड दिलेले आहे. 2022 रोजी पक्ष खत्म झाला. त्यानंतर ते फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहू पाहत आहेत. त्यामुळे ते तावून सलाखून निघाले आहेत. तर राज ठाकरे हे तावून-सुलाखून निघाले आहेत. पण राज ठाकरे यांचे तसे नाही. त्यांच्या भाषणाला गर्दी नेहमीच होते. पण त्याचे मतात रूपांतर होत नाही. दोघांमध्ये प्रगल्भता वाढली आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्र काहीतरी ठरवतीलच असे राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांना वाटते.

उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्याचा डाव?

तर राजकीय विश्लेषक संजय वरकड यांनी एक वेगळीच शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, राज ठाकरे यांचे महत्त्व वाढवण्यासाठी भाजपाने ही खेळी खेळली आहे. मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून मुंबई महापालिकेत त्यांना मोठे यश मिळावता आले नाही. त्यात विधानसभेत उद्धव ठाकरे गटाला सेटबॅक बसला. आता ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी दोघांना एकत्र आणण्यात येत आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना मुंबईसह राज्यातील राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी सुद्धा दोघे एकत्र येणे गरजेचे होते, असे त्यांना वाटते.

एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.