VIDEO: दोन घेत, चार देत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिवेशन पार पडलं, अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य

राज्याचं अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलं. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली.

VIDEO: दोन घेत, चार देत, अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिवेशन पार पडलं, अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य
sanjay raut
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 10:25 AM

मुंबई: राज्याचं अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलं. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. दोन घेत, चार देत त्यांनी अधिवेशन हाताळलं, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.

शिवसेना नेते संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. पण त्यांना काही पथ्य आहेत. मात्र, तरीही ते अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून होते, असं सांगतानाच विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडलं. अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने टोले देत टोले घेत, दोन देत चार घेत अशा प्रकारे अधिवेशन पार पडलं, असं राऊत म्हणाले.

इतके दिवस हेच अत्तर अंगाला चोपडून राजकारण करत होतं?

उत्तर प्रदेशात पीयूष जैन या अत्तराच्या व्यापाऱ्याकडे कोट्यवधीचं घबाड सापडलं. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पार्टीवर निशाना साधला आहे. उत्तर प्रदेशात तापलेल्या या अत्तराच्या राजकारणावरूनही राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. अत्तराचेही राजकारण आपल्या देशात होऊ शकतं. एवढा आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका अत्तर व्यापाऱ्याकडे घबाड मिळालं. महागडं अत्तर मिळाल्याने प्रत्येकाला वाटत आपण अत्तर विकावं. आता हे अत्तर कुणाचं नक्की? इतके दिवस कोण अंगाला चोपडून राजकारण करत होतं? याच्यावर वास सुरू आहे. पण राजकारणात प्रत्येकाला अत्तराची गरज आहे. कुणी कितीही टीका केली तरी अशा अत्तराच्या सुंगधाशिवाय कोणीच राजकारण करू शकत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

हमाम में सब नंगे है

राजकारणात सर्व मोठे लोक अशा प्रकारचं महागडं अत्तर घरात ठेवत असतात. मात्र दुसऱ्यांच्या घरात मिळाल्यावर त्याची चर्चा होते. लखनऊ, कनौज, कानपूरमध्ये 180 कोटींचं पेपर परफ्यूम मिळालं आहे. कलरफूल. आता त्यावर राजकारण होत आहे. गोव्यात काय चाललंय? उत्तर प्रदेशात काय चालणार? पंजाबात काय होणार? याच परफ्यूमचा वापर करून तुम्ही निवडणुका लढणार आहात आणि जिंकणार आहात. राजकारणाच्या हमाम में सब नंगे है. मग तुम्ही कितीही अत्तर लावा. जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

पाकिस्तानचा दिवाना, मुंबईकर प्रेयसीला भेटायला रवाना, कांदिवलीतील ‘त्या’ पत्त्यावर तरुणी राहतच नव्हती

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेदवार देणार, भाई जगताप यांचा पुनरुच्चार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.