आधी ‘मातोश्री’जवळचा चहावाला, आता ‘वर्षा’वरील महिला पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Woman Police of Varsha bungalow tests corona positive) बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

आधी 'मातोश्री'जवळचा चहावाला, आता 'वर्षा'वरील महिला पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबई : मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Woman Police of Varsha bungalow tests corona positive) बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मुख्यमंत्री या बंगल्यात वास्तव्यास नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्र्यातील मातोश्री या निवासस्थानी राहतात. काही दिवसापूर्वी मातोश्री बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

दरम्यान, ‘वर्षा’वरील संबंधित महिला पोलीस अधिकारी झोन टूमधील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी त्यांची ड्युटी वर्षा बंगल्यावर लागली होती. त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांच्या संपर्कातील इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं. (Woman Police of Varsha bungalow tests corona positive)

मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याभोवती सुरक्षेचं कडं असते. अनेक स्तरावरचा बंदोबस्त इथे लावला जातो. विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इथे खडा पहारा देत असतात. याच सुरक्षेसाठी संबंधित महिला अधिकारीही बंदोबस्तावर होती. त्यांची ड्युटी वर्षा बंगल्याबाहेर होती. आता त्यांना लागण झाल्याने, त्यांच्या संपर्कातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.

राज्यात 49 पोलिसांना कोरोनाची लागण महाराष्ट्रातील तब्बल 49 पोलिसांना कोरोना लागण झाली आहे. यामध्ये 11 अधिकारी आणि 38 पोलीस कर्मचाऱ्यांचं समावेश आहे. 22 मार्चपासून आतापर्यंत 49 पोलीस कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

पुण्यातील दोन पोलीस पॉझिटिव्ह

पुण्यातील दाटीवाटीच्या भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यानंतर आता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. नुकतंच पुणे पोलीस दलातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील दादर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एक पोलिसाला कोरोना झाला आहे.

(Woman Police of Varsha bungalow tests corona positive)

संबंधित बातम्या 

पुण्यात दोन पोलिसांना कोरोनाची लागण, दादर पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’जवळचा चहावाला ‘कोरोना’ग्रस्त, चहावाल्याकडे गेलेले पोलिसही क्वारंटाईन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI