मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयात कुत्र्यांचा धुमाकूळ, रुग्णांच्या आजूबाजूला कुत्र्यांचा पहारा

चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Nagpur Medical Hospital dogs around patients)

मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयात कुत्र्यांचा धुमाकूळ, रुग्णांच्या आजूबाजूला कुत्र्यांचा पहारा


नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वॉर्डात सुरक्षारक्षकांऐवजी कुत्रे पहारा देत असल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यासंदर्भात चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Nagpur Medical Hospital dogs around patients)

मध्य भारतातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय म्हणून नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची ओळख आहे. मात्र या रुग्णालयाची सुरक्षाव्यवस्था किती ढिसाळ आहे, यासंदर्भातील अनेक घटना इतिहासात घडलेल्या आहेत. आता तर चक्क मेडिकलच्या अनेक वार्डात सुरक्षारक्षकांऐवजी मोकाट कुत्रेच दिवस रात्र पहारा देत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओ रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्हायरल करण्यात आले आहे. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.

यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. यासंदर्भातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आल्याचा दावा शासकीय रुग्णालयाकडून दिला जात आहे.

या रुग्णालयात केवळ नागपूर जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील 11 जिल्ह्यांसाह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह तेलंगणा येथील रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी अल्प दरात उपचार केले जातात. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल या दोन मोठ्या रुग्णालयांचा आधार मिळतो. (Nagpur Medical Hospital dogs around patients)

रुग्णालयाच्या वॉर्डात मोकाट कुत्र्यांचा पहारा 

मात्र या ठिकाणी अव्यवस्थेचा बाजार असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. आता तर चक्क अनेक वार्डमध्ये मोकाट कुत्र्याचा मुक्तसंचार बघायला मिळतो आहे. एवढंच नाही तर रात्री झोपलेल्या रुग्णाच्या बॅगेत किंवा बाहेर असलेले खाद्य पदार्थ कुत्रे खातात. त्यामुळे इतर गंभीर आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मेडिकलच्या सामान्य वॉर्डमध्ये मोकाट कुत्रे फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी अनेक रुग्णांनी याबाबतची सूचना दिली होती. मात्र या घटनेबाबत यापूर्वी माहिती दिली असती, तर त्यावेळी तात्काळ कारवाई करण्यात आली असती, असे स्पष्टीकरण मेडिकलचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिले आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. (Nagpur Medical Hospital dogs around patients)


संबंधित बातम्या : 

कंगनासारख्या फुटकळ बाईने रिहानावर टीका करु नये; शिवसेनेचा हल्लाबोल

नवी मुंबईत शाळेची बेल वाजणार, पालकांना मेसेज, काय काय करावं लागणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI