Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु ?

Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु ? (Nagpur Corona Unlock new rule)

Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु ?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:14 AM

नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक 7 जूनपासून पाचवाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील. यापूर्वीची दोन वाजेपर्यंतची शिथीलता आता पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र पाच वाजल्यानंतर उपहारगृहे वगळता अन्य सर्व घटकांसाठी जमावबंदी (5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास बंदी )लागू राहील, अशी माहिती ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज (6 जून) पत्रकार परिषदेत दिली. (Nagpur Unlock new rule due to decrease in Corona patient guardian minister Nitin Raut announced new rules for Nagpur city and district know all details)

येत्या शुक्रवारपर्यंत नियम लागू

आज दिवसभरातील विविध बैठकांनंतर सायंकाळी साडेसात वाजता पालकमंत्र्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत शहरातील निर्बंध जारी केले आहेत. या पत्रकार परिषदेला पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, आदी उपस्थित होते.

सध्या मोठ्या प्रमाणत लसीकरण करण्यावर भर देणार : नितीन राऊत

नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी कोरोना विरुद्धची लढाई कायम असून मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यावर भर देण्याची सूचना त्यांनी आज प्रशासनाला केली. त्रिसूत्रीचे पालन आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना गेलेला नाही. कोविड नियमांचे पालन करून कोविड नियंत्रणात ठेवण्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच सात जून पासून नागपूर शहर आणि  ग्रामीण भागासाठी काही निर्बंध तसेच काही ठिकाणी शिथीलता त्यांनी जाहीर केली. पुढील शुक्रवार पर्यंत हे निर्बंध आणि शिथिलता लागू असेल. त्यानंतर पुन्हा पुढील शुक्रवारी या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत जारी करण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे

1. आवश्यक वस्तूंचे दुकान सुरु ठेवण्याची वेळ पाच वाजेपर्यंत राहील.

2. आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकानांची, आस्थापनांची वेळ पाच वाजेपर्यंत राहील.

3. शहरातील मॉल, चित्रपट गृहे ,मल्टिप्लेक्स नाट्यगृहे  50 टक्के क्षमतेमध्ये फक्त पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.

4. उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेत रात्री दहा पर्यंत सुरू ठेवता येतील.

5. लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.

6. सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वॉकिंग, सायकलिंगसाठी सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ अशी परवानगी आहे.

7.खासगी कार्यालये सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीत 5 वाजेपर्यत सुरु ठेवता येईल.

8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता 100 व्यक्तीपर्यंत मर्यादित आहे.

9. लग्न समारंभ मंगल कार्यालयाच्या 50% क्षमतेच्या उपस्थितीत करता येईल. मात्र ही पन्नास टक्के उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत शंभर

लोकांपेक्षा अधिक असता कामा नये.

10.अंत्यसंस्कार अधिकाधिक 50 लोकांच्या उपस्थित राहता येईल.

11.बैठका, निवडणुका, स्थानिक प्रशासन व स्थायी समितीच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने  घेता येतील.

12.बांधकाम करण्यास परवानगी आहे.

13.कृषी, शेतीच्या सर्व कामांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी आहे.

14. ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित असेल

15.जीम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र पाच वाजेपर्यंत सुरू राहतील.

16. सार्वजनिक वाहतूक मालवाहतुकीला परवानगी असेल. बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बध असेल.

17. आंतरजिल्हा प्रवास, खासगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू असतील. मात्र ज्या जिल्हयात ई -पास आवश्यक

असेल तिथे स्थानिक नियम पाळावे.

18. उत्पादन निर्यात करणाऱ्या कंपन्यांना माल निर्यात करता येईल. .

1. शाळा कॉलेजेस सर्व बंद असतील

20.सर्व धार्मिक स्थळे बंद असतील

21. सर्व जलतरण तलाव बंद असतील

इतर बातम्या :

Satara Unlock : साताऱ्यातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, नवे नियम लागू, काय सुरु काय बंद?

मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत, पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी

Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

(Nagpur Unlock new rule due to decrease in Corona patient guardian minister Nitin Raut announced new rules for Nagpur city and district know all details)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.