AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण, डेल्टा प्लसचे संशयित, पुणे प्रवासाची पार्श्वभूमी, नागपूरकरांमध्ये धाकधूक

काही दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. सलग दोन महिन्यानंतर कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं आढळून येत आहे.

एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण, डेल्टा प्लसचे संशयित, पुणे प्रवासाची पार्श्वभूमी, नागपूरकरांमध्ये धाकधूक
| Updated on: Jul 07, 2021 | 8:53 AM
Share

नागपूर :  काही दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. सलग दोन महिन्यानंतर कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं आढळून येत आहे. नागपुरात काल एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. तसंच डेल्टा प्ल्सचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. (6 members of the same family infected with corona In nagpur Delta Plus suspect Pune travel background)

कोरोनाची लागण, डेल्टा प्लसचे संशयित, आमदार निवासात क्वारन्टाईन

कोरोना रुग्णांची मंदावलेली संख्या नागपूरकरांसाठी दिलासादायक गोष्ट मानली जात होती. मात्र दोन महिन्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झालीय.

त्यात भरीस भर म्हणजे डेल्टा प्लसचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्या सहाही जणांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या सहा जणांची पुणे प्रवासाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये धाकधूक आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात

गेल्या दोन महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांची नोंद 24 एप्रिल रोजी झाली होती. त्यावेळी एकाच दिवसांत जवळपास आठ हजार रुग्णांची भर पडली होती. मात्र गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या एकदमच कमी झाली होती. नागपूर प्रशासनाचं आणि महापालिकेचं हे मोठे यश मानले जात होतं. परंतु आता पुन्हा एकदा शहरी भागात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे.

(6 members of the same family infected with corona In nagpur Delta Plus suspect Pune travel background)

हे ही वाचा :

VIDEO | नागपुरात पुन्हा लसींचा तुटवडा, लसीकरण बंद असल्याने नागरिक त्रस्त

Delta Plus Update: नागपूरवर डेल्टा प्लसचं संकट? एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, प्रशासन ॲलर्ट

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.