AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू यांनी घेतली मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची भेट; दोषींवर कारवाईचे आश्वासन

सात जुलैच्या रात्री नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग मनोज ठवकरचा मृत्यू झाला होता. या घटनेवर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटली आहेत.

बच्चू कडू यांनी घेतली मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची भेट; दोषींवर कारवाईचे आश्वासन
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 1:02 AM
Share

नागपूर : नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबियांची आज राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. बच्चू कडू हे मनोज ठवकरच्या नागपुरातील घरी गेले होते. यावेळी त्यांनी मनोजच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच दोषींवर सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन कडू यांनी मनोजच्या कुरुंबियांना दिले. (Bachchu Kadu visits Manoj Thavkar’s family; Assurance of action against the culprits)

पारडी परिसरात पोलिसांविरोधात जनतेचा मोठा रोष

सात जुलैच्या रात्री नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग मनोज ठवकरचा मृत्यू झाला होता. या घटनेवर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मास्क लावला नाही आणि हेल्मेट घातले नाही या कारणामुळे झालेल्या वादातून पोलिसांनी मनोजला मारहाण केली होती. त्या मारहाणीत मनोज ठवकरचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनोज ठवकर राहत असलेल्या पारडी परिसरात पोलिसांविरोधात जनतेचा मोठा रोष दिसून आला होता.

दोषी पोलिसांविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच नागपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील मनोजच्या कुरुंबीयांची भेट घेतली होती. त्यांच्यानंतर आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे महाराष्ट्र सरकारच्या वतीने ठवकर कुटुंबियांना भेटले आणि त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे तसेच दोषी असल्यावर पोलिसांविरोधात कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात 7 जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. यादरम्यान पोलिसांनी मनोजची दुचाकीही थांबवली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली. त्यानंतर वाद झाला आणि पोलिसांनी मनोजला मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या मारहाणीनंतर बेशुद्ध

मनोजने त्याच्या दुचाकीने मुद्दाम पोलिसांच्या वाहनावर धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आले होते. (Bachchu Kadu visits Manoj Thavkar’s family; Assurance of action against the culprits)

इतर बातम्या

अश्लील फिल्म; यूकेचा सर्व्हर ते ओटीटी प्लॅटफॉर्म, राज कुंद्रा अटकेत, नेमकं प्रकरण काय?

बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घरी बोलावलं, नंतर कथित पतीची एन्ट्री, अहमदनगरमध्ये पुन्हा हनी ट्रॅप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.