पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा; फडणवीसांची मागणी

ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. (bjp leader devendra fadnavis demand help to flood affected people of marathwada)

पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा; फडणवीसांची मागणी
Devendra Fadnavis

नागपूर: ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (bjp leader devendra fadnavis demand help to flood affected people of marathwada)

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

सर्व घोषणा हवेत विरल्या

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कोस्टलचा आराखडा मंजूर झाल्याचा आनंद

यावेळी त्यांनी कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केलं. कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाला हे चांगलं झालं. आमचं सरकार असताना आम्ही हा आराखडा तयार केला होता. मी स्वत: कोस्टल रोडसाठी प्रयत्न केला होता. कोस्टल रोडमुळे सिडकोमधील अनेक प्रकल्प मार्गी लागतील असंही त्यांनी सांगितलं.

पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही टीका करतील

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षव नाना पटोले यांच्या एका टीकेवर प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. नाना पटोले हे काहीही बोलत असतात. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते अमेरिकेच्या अध्यक्षांवरही टीका करतील. त्यामुळे त्यावर बोललचं पाहिजे का?, असा सवालही त्यांनी केला.

कोकणात अजूनही मदत नाही

दरम्यान, फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असं ते म्हणाले होते.

पोकळ शब्द किंवा आश्वासन नको

कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. (bjp leader devendra fadnavis demand help to flood affected people of marathwada)

 

संबंधित बातम्या:

वाशिमच्या ग्रामपंचायतींनी 107 कोटींचं वीज बिल थकवलं, महावितरणकडून कनेक्शन कट मोहिम, पाणी पुरवठा योजना संकटात

Bhavana Gawali | ईडीच्या निशाण्यावर असलेल्या खासदार भावना गवळी यांची राजकीय कारकीर्द

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक?,आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत; काँग्रेसची चौकशी समिती नागपुरात

(bjp leader devendra fadnavis demand help to flood affected people of marathwada)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI