AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime | किरायाने राहायला आली नि पोरगी पटवली, लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार

ती सतरा वर्षांची तर तो तीस वर्षांचा दोघांचेही सूत जुळून आले. तीन वर्षांपासून त्यांचे संबंध होते. पण, त्याने लग्नासाठी दुसरी मुलगी सिलेक्ट केली. त्यामुळं पीडित युवतीनं त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

Nagpur Crime | किरायाने राहायला आली नि पोरगी पटवली, लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 12:26 PM
Share

नागपूर : सोनू सूर्यवंशी असे प्रियकराचे नाव आहे. सोनू छायाचित्रकार असून त्याचा स्टुडिओ आहे. काही दिवसांपूर्वी तो युवतीच्या घरी किरायाने राहायचा. यादरम्यान त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ती सतरा वर्षांची होती. तेव्हापासून सोनूने तिचा उपभोग घेतला. तिच्या आईवडिलांशी गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याने जवळीकता वाढविली. मोबाईल नंबरवर चँटिंग, मिटिंग झाले. तीन वर्षे संबंधित युवतीशी त्याने शारीरिक संबंध (Physical contact) ठेवले. पण, लग्न करण्यास नकार दिला. दुसऱ्या युवतीशी लग्न जुळविण्याचा त्याचा प्रयत्न होता. अशात पीडित युवतीने जरीपटका पोलिसांत (Jaripatka police) तक्रार दाखल केली. त्यामुळे हळद लागण्यापूर्वी जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकते. एका खासगी कंपनीत (Private company) ती काम करत होती.

विनापरवाना बाबा सावजीमध्ये दारूविक्री

दुसऱ्या घटनेत, नागपूर शहरातील बाबा सावजी येथे विना परवाना दारूविक्री होत होती. शहर पोलिस परिमंडळ क्रमांक एकच्या पथकाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी या ठिकाणी ग्राहक हे दारू पिताना दिसून आले. तसेच, सावजी मालकाकडे यासंदर्भातील परवाना नव्हता. त्यामुळं पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. एकोणतीस ऑक्टोबर २०२१ रोजी शहर पोलीस येथील परिमंडळ क्रमांक एकच्या पोलीस उपआयुक्त लोहित मतानी यांना माहिती मिळाली. त्यानुसार प्रतापनगर हद्दीतील हिंगणा टी पॉईंट येथील बाबा सावजी येथे अवैधरित्या विनापरवाना दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिली जात होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत लोक दारू पिण्याकरिता येत होते. माहितीनुसार पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही व्यक्ती हे या ठिकाणी दारू पिताना सापडले. यासंदर्भात पथकाने सदर बाबा सावजीचे मालक विजय लक्ष्मण पौनीकर यांना विचारणा केली. त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. यावरून पथकाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.