AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण

त्यांच्या समर्थनार्थ हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं कारण
| Updated on: Oct 17, 2022 | 2:55 PM
Share

गजानन उमाटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-election) भाजपनं अर्ज मागे घेतलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज नागपुरात ही घोषणा केली. ‘महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा लक्षात घेता आम्ही सहानुभूतीने हा अर्ज मागे घेत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र आम्ही पराभवाच्या भीतीने माघार घेतली नाही. 2024 मध्ये आम्ही नक्की विजयी होऊ, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, रिपाई आणि भाजप यांनी कमळवर निवडणूक लढण्याचं निश्चित केलं होतं. मुरजी पटेल यांनी अंधेरीतून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, केंद्रीय आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वानं हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. मुरजी पटेल यांचा अर्ज आम्ही परत घेत आहोत. या निवडणुकीत सौ. लटके या निवडून याव्यात. यासाठी त्यांच्या समर्थनार्थ हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत.

मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरताना 15 हजार लोकांची रॅली काढण्यात आली होती. मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपचा उमेदवार ठरला की, तो भाजपच्या निर्णयाच्या विरोधात जात नाही. त्यामुळं मुरजी पटेल हे अपक्ष लढणार नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं.

आमची संपूर्ण तयारी झाली. मतांची जुळवजुळव सुरू होती. आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवात ही निवडणूक जिंकणार होतो. पण, एक वर्षासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. असा निर्णय भाजपनं अनेकवेळा घेतला आहे. एखाद्याचं निधन होतं तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जाते. ही भाजपची संस्कृती अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून आहे.

त्यामुळं भाजपनं सौ. लटके यांना समर्थन दिलं आहे. पक्ष म्हणून आम्ही आमची उमेदवारी भरली.पूर्ण ताकद लावली. पण, राज्याची परंपरा, संस्कृती टिकविण्यासाठी उमेदवारी मागे घेत आहोत, असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंचं पत्र हा एक भाग आहे. 1980 पासून अनेकवेळा अशा घटना आल्यात. त्यावेळी अशावेळी असा निर्णय घेतला. एखाद्या परिवारातील व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या कुटुबातील व्यक्ती निवडणूक लढत असेल, तर असा निर्णय घेतला जातो.

सौ. लटके वहिनी यांच्या पतीच्या निधनानंतर त्या ही पोटनिवडणूक लढत आहेत. त्यामुळं हा निर्णय वरिष्ठांनी केला. योग्य पद्धतीनं आमचं नेतृत्व निर्णय घेतो, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.