AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभकोणी महाधिवक्ता असताना कोर्टाचे निर्णय राज्य सरकारच्या विरोधात का?, नाना पटोलेंना संशय; चौकशीची मागणी

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. (congress leader nana patole raised questions on ashutosh kumbhakoni)

कुंभकोणी महाधिवक्ता असताना कोर्टाचे निर्णय राज्य सरकारच्या विरोधात का?, नाना पटोलेंना संशय; चौकशीची मागणी
nana patole
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 4:31 PM
Share

नागपूर: राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. कुंभकोणी महाधिवक्ता असताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्य सरकारच्या विरोधात का जात आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुंभकोणी यांना बदललं का नाही?, असा सवालही पटोले यांनी केला आहे. (congress leader nana patole raised questions on ashutosh kumbhakoni)

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संशय व्यक्त केला आहे. 2017मध्ये एका परिपत्रकाच्या आधारावर तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या. त्यावेळी महाधिक्ता कुंभकोणी होते. आजही कुंभकोणीच अधिवक्ता आहेत. तरीही कोर्टाचे निर्णय वारंवार सरकारच्या विरोधात का येत आहेत. याबाबत आम्हाला संशय आहे म्हणून या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे आमचं दायित्व आहे, असं पटोले म्हणाले.

फडणवीस सरकारला कसं जमलं?

हा एका मोठ्या समुहाचा प्रश्न आहे. ओबीसींचं राजकीय नुकसान होणार आहे. त्यांचं आरक्षण जाऊ नये याची काळजी घेणं हे आमचं काम आहे. म्हणून आम्ही आमच्या मनातील संशय व्यक्त केला आहे. सरकारने त्याचा तपास करायला हवा. 73व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली की त्यावर लगेच प्रशासक नेमला जातो. एकही दिवस वाया घालवता येत नाही. मात्र, फडणवीस सरकारने दोन वर्षे निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामागची कारणं काय होती? त्याची माहिती घेतली पाहिजे. आज सर्वोच्च न्यायालय वारंवार ओबीसींच्या जागा बाजूला सारून निवडणुका घ्या असं का म्हणत आहे. म्हणून आमच्या मनात संशय आला. त्यामुळे राज्य सरकारला आम्ही आमची सूचना कळवली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आताच केसेस का हरल्या जातात?

ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. भाजप ओबीसीवर नेहमी अन्याय करत आलं आहे. मागासवर्गीय मराठा असो किंवा इतर जातींना भाजपला आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळं ते अडचणी आणत आहेत. ज्यांनी आरक्षण संपवलं तेच म्हणतात नेत्यांना फिरू देणार नाही, अशी टीका त्यांनी केली. ओबीसीवर भाजप सतत अन्याय करत आहे. ओबीसी नेत्यांवर आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करत आहे. काही झारीतले शुक्राचार्य आहेत. मागच्या सरकारच्या काळातही अॅडव्होकेट जनरल होते आणि याही सरकारच्या काळात तेच आहेत, सातत्यानं ते केस हरत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका तपासून बघण्यात येईल, असं विधान त्यांनी केलं.

तर आयोगच बनवला नसता

यावेळी ओबीसी आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं. मागास आयोग डेटा गोळा करण्याचं काम करणार आहे. पण आयोग लोकांपर्यंत पोहचत असताना कोरोना सुद्धा आहे याचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारने सांगितलं आहे. आम्ही जाती जनगणना करायची नाही. त्यामुळे आयोगाने डाटा गोळा करण्यासाठी 450 कोटी रुपये मागितले आहेत. ओबीसींना आरक्षण न देण्याची राज्य सरकारची भूमिका नसती तर आयोग बसविला नसता, असंही त्यांनी सांगितलं. (congress leader nana patole raised questions on ashutosh kumbhakoni)

संबंधित बातम्या:

ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार, केंद्राने इम्पिरिकल डेटा द्यावा; नाना पटोले यांची मागणी

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

(congress leader nana patole raised questions on ashutosh kumbhakoni)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.