AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा; नाना पटोले यांचा घणाघात

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता. (Modi Cabinet Expansion)

हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा; नाना पटोले यांचा घणाघात
nana patole
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 1:35 PM
Share

नागपूर: केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता. मोदीच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे. (congress leader nana patole reaction on Modi Cabinet Expansion)

इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने 10 दिवस आंदोलनाचा धडाका सुरू केला आहे. आज नागपूरमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना नाना पटोले यांनी ही टीका केली. मोदींच्या मंत्री मंडळातून चांगल्या मंत्र्यांना, काम करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. संजय धोत्रे हे चांगलं काम करत होते. त्यांनाही मंत्रिमंडळातून काढलं आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना ठेवलं आहे. ज्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार नाही, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवलं आहे, असं सांगतानाच कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. कोरोनामुळे देशात अनेकांचे जीव गेले. हा मोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच हे घडलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता, असं पटोले म्हणाले.

सर्व कारभार पीएमओतून

केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंना घेतलं की पाटलांना घेतलं. याने काही फरक पडत नाही. सर्वच खात्याचा कारभार पंतप्रधान कार्यालयातून चालतो. या मंत्र्यांना थोड्याच दिवसात वस्तुस्थिती माहिती पडेल. त्यामुळे ते जमिनीवर येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

सामान्य माणसांचे जगणे मुश्किल

उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता 850 रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल 30 रुपये लिटर व डिझेल 22 रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी 100 रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

भरपावसात भिजत सायकल यात्रा

महागाईच्या विरोधात आज नागपूरात काँग्रेसने सायकल यात्रा काढली. भर पावसात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात केंद्रे सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मुसळाधार पावसात भिजत नाना पटोले, कॅबिनेट मंत्री सुनील केदार या सायकल यात्रेत सहभागी झाले. यावेळी काँग्रेस आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, प्रवक्ते अतुल लोढे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सायकल यात्रेत सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, खाद्यतेलाच्या महागाई विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. (congress leader nana patole reaction on Modi Cabinet Expansion)

संबंधित बातम्या:

चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!

केंद्रीय मंत्री कसा झालो?; भागवत कराड यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

भाजपात पुन्हा ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘बाहेरचे’? मोदी कॅबिनेट विस्तारावर महाराष्ट्रात मोठी चर्चा, काय घडलंय?

(congress leader nana patole reaction on Modi Cabinet Expansion)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.