Nagpur Rural | दुपारी चार ते आठची वेळ धोक्याची!, अपघातात बळी पडतेय तरुणाई; सुरक्षेचे धडे देणार कोण?

नागपूर ग्रामीणमध्ये दोन लाख पंचाहत्तर हजार विद्यार्थी शिक्षण देतात. त्यांना जागृत करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पोलीस निरीक्षक व तीन-चार पोलिसांची टीम प्रशिक्षण घेत आहे.

Nagpur Rural | दुपारी चार ते आठची वेळ धोक्याची!, अपघातात बळी पडतेय तरुणाई; सुरक्षेचे धडे देणार कोण?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 4:46 PM

नागपूर : ग्रामीण पोलिसांनी एका सर्व्हे केला. यानुसार ग्रामीण भागात दुपारी 4 ते रात्री 8 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात मोठ्या संख्येत तरुण बळी ठरत आहेत. त्यामुळं नागपूर ग्रामीण पोलिसांनी थेट विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचे धडे देण्याचे अभियान हाती घेतले आहे. रस्त्यांवर चालताना सुरक्षित कसं राहता येईल, हेही शिकविलं जाणार आहे.

काम करून परतताना जास्त अपघात

काही गोष्टींची ठराविक वेळ असते. मात्र जास्त अपघात होण्याची सुद्धा वेळ असते. हे ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, यात  तथ्य आहे. कारण नागपूरच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अपघात वाढले होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि कारण शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी एक सर्वेक्षण केलं. यात दिसून आलं की दुपारी 4 ते संध्याकाळी 8 या वेळात अपघात जास्त होतात. त्याची आकडेवारीसुद्धा पोलिसांनी दिली. या काळात वर्ष भरात ग्रामीण भागात 340 अपघात घडले. याची कारण वेगवेगळी आहेत. शेतातून, कंपनीमध्ये काम करून  घरी परतणारे, चुकीच्या मार्गाने गाडी चालविणारे, दारू पिऊन गाडी चालविणे यामुळं सर्वाधिक अपघात घडले. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस फॉर स्टुडंट, स्टुडंट फॉर पोलीस हा उपक्रम हाती घेण्यात आला. पोलीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या माध्यमातून अपघात कमी करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी दिली.

ग्रामीण भागात केली जाणार जागृती

या संपूर्ण सर्वेक्षणातून पुढे आलं की यात जास्तीत जास्त युवकांचे अपघात झाले आहेत. यावर निर्बंध आणण्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला. यासाठी 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामीण भागात जागृती केली जाणार आहे. याला यश कितपत येईल आणि अपघात नियंत्रण किती होईल हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

पोलीस निरीक्षकाच्या मदतीला तीन कर्मचारी

नागपूर ग्रामीणमध्ये दोन लाख पंचाहत्तर हजार विद्यार्थी शिक्षण देतात. त्यांना जागृत करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पोलीस निरीक्षक व तीन-चार पोलिसांची टीम प्रशिक्षण घेत आहे. शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती गृहमंत्र्यांना देण्यात आली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी दिली.

कोणत्या वेळात किती अपघात झाले

मध्यरात्री 12 ते 4 च्या दरम्यान 37 अपघात  पहाटे 4 ते सकाळीच्या दरम्यान 64 अपघात सकाळी 8 ते दुपारी 12 च्या दरम्यान 139 अपघात दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान 239 अपघात दुपारी  4  ते रात्री 8 च्या दरम्यान 340 अपघात रात्री 8 ते 12 मध्यरात्रीच्या दरम्यान 160 अपघात

Nagpur Crime | इंस्टावर फुलले प्रेम, प्रेयसीला घेण्यासाठी प्रियकर आला; पण, घडले भलतेच…

Nagpur Crime | कुत्रे यायचे खायला, धाब्याच्या मालकाला आला राग; तीन कुत्र्यांच्या पिल्लांवर उगवला सूड!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.