देवेंद्र फडणवीस पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून बोलतात?, अमृता फडणवीस यांचं थेट उत्तर; काय म्हणाल्या?

मला ट्रोल केलं जातं. देवेंद्र फडणवीस माझ्या मागे खंबीरपणे आहेत. त्यामुळे मला ट्रोलरची भीती वाटत नाही.

देवेंद्र फडणवीस पत्नीच्या खांद्यावर बंदूक ठेवून बोलतात?, अमृता फडणवीस यांचं थेट उत्तर; काय म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 7:52 AM

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच राजकीय प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे त्या कधीकधी ट्रोल होतात. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे विरोधकही अनेकदा आक्रमक होताना दिसतात. अमृता फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस आपली राजकीय पोळी भाजत असल्याची टीकाही फडणवीस यांच्यावर होत असते. विरोधकांच्या या टीकेला स्वत: अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी स्पष्टेवक्ती आहे. मला जे वाटतं तेच मी बोलते. त्याच्याशी देवेंद्र यांचा काहीच संबंध नसतो, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

नागपूरमध्ये अभिरुप न्यायालय पार पडलं. यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मी राजकारणात फार पडत नाही. मी माझे विचार मांडत असते. ट्विटर चा वापर फार करत नाही. पण वेळ मिळाला तेव्हा माझं ट्विटर अकाउंट मी वापरते. माझ्याकडे कोणी ट्विटरर नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मी जास्त पॉलिटिकल बोलत नाही. मला वाटलं तरच बोलते. जास्त पॉलिटकल बोलू नये हाच माझा प्रयत्न असतो. त्यामुळे माझं आणि देवेंद्रजींचं नुकसान होतं. लोक म्हणतात देवेंद्रजी माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलतात. मात्र ते खरं नाही. मला वाटत तेच मी बोलते, असं त्या म्हणाल्या.

मला ट्रोल केलं जातं. देवेंद्र फडणवीस माझ्या मागे खंबीरपणे आहेत. त्यामुळे मला ट्रोलरची भीती वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सुषमा अंधारे आधी मला माझ्यासारख्या स्पष्ट वक्त्या वाटायच्या. पण आता त्या दिलेली स्क्रिप्टच वाचतात. काही लोक स्क्रिप्ट वाचूनच बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा कमाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा माझी कमाई अधिक आहे. मात्र, सामाजिक कार्य हीच देवेंद्रजींची कमाई आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी आधी लाजरी बुजरी होती हे खरं आहे. मी लहानपणापासून टॉमबॉय टाईप होते. माझं लग्न होऊन मी देवेंद्रजींकडे गेले तेव्हा त्यांच्या घरी ते राजकारणात असल्याने ओपन हाऊसप्रमाणे राहायचे. कार्यकर्ते सरळ घरात यायचे. बेड रूमपर्यंत जायचे. मग मला त्यात सुधार करावा लागला. मी म्हणायचे थांबा मी त्यांना पाठवते, असं त्या म्हणाल्या.

मी इकडे आल्यानंतर सामाजिक कार्य करू लागले. लोकांचे प्रॉब्लेम समजून घेतले. आई-बाबा आधीपासून सोशल वर्क करायचे. मी आई (सासू) ला घाबरते. आमच्या घरात सगळे एकत्र असतात, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.