AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद; पोलीस ठाण्यासमोरचं एकमेकांविरोधात भिडण्याचे कारण काय?

बाहेरून आलेल्या गटात पाच तृतीयपंथी होते. तर, स्थानिक पन्नास तृतीयपंथी एकत्र आले. संख्येने कमी असणाऱ्या तृतीयपंथींनी पळ काढला. पाठलाग करणाऱ्यांना एक-दोघांना पकडले. त्यांची चांगलीच धुलाई केली.

नागपुरात तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद; पोलीस ठाण्यासमोरचं एकमेकांविरोधात भिडण्याचे कारण काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 12:38 PM
Share

नागपूर : तृतीयपंथीय हे लोकांकडून पैसे (Money from people) मागतात. त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांचे वेगवेगळे गट असतात. बहुधा ते आपआपल्या इलाक्यात फिरतात. त्यामुळं वाद होण्याचा प्रश्न येत नाही. मोतीबागेतील तृतीयपंथी रेल्वेत वसुली (Recovery in Railways) करतात. परंतु, आरपीएफनं त्यांच्यावर वसुलीसाठी निर्बंध लावलेत. त्यामुळं ते हंसापुरी भागात वसुलीसाठी गेले. हंसापुरी भागात आधीच काही तृतीयपंथी वसुली करत होते. बाहेरून कुणीतरी येण्याची भनक त्यांना लागली. जुन्या तृतीपंथींनी नव्याने आलेल्या तृतीयपंथीयांचा पाठलाग केला. आधी यादवनगर आणि त्यानंतर मारवाडी चौकात ते फिरले. बाहेरून आलेल्या गटात पाच तृतीयपंथी होते. तर, स्थानिक पन्नास तृतीयपंथी एकत्र आले. संख्येने कमी असणाऱ्या तृतीयपंथींनी पळ काढला. पाठलाग करणाऱ्यांना एक-दोघांना पकडले. त्यांची चांगलीच धुलाई केली. आमच्या भागात वसुलीसाठी कसेकाय आलेत, याचा जाब विचारला. मार खाणाऱ्यांनी लकडगंज पोलीस (Lakdaganj Police) ठाणे गाठले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं काहीसे प्रकरण निवडले.

जखमी तृतीयपंथी रुग्णालयात

जुन्या तृतीयपंथींनी त्यांच्या भागात आलेल्या नवीन तृतीयपंथींना चांगलाच चोप दिला. त्यामुळं जीवाच्या आकांताने ते लकडगंज पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी मध्यस्थी केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सहपोलीस आयुक्त अश्विनी दोरजे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनीही घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई केली.

टोळीयुद्ध भडकण्याचे संकेत

तृतीयपंथीयांच्या गटांमधील वाद हे नेहमीच होत असतात. वसुली कोण करेल, यावरूनच हे वाद होतात. तृतीयपंथी चमचम गजभियेचा वसुलीच्या असमान वाटपातून खून झाला होता. टोळीच्या मोरक्यावरून खुनाचा आरोप आहे. गल्लीबोळातही तृतीयपंथी वसुलीसाठी फिरतात. रस्त्याच्या चौकाचौकात तर ते हमखास दिसतात. पण, एखाद्याच्या भागात दुसरा वसुली करत असेल, तर त्यांच्यात वाद होतात. ए हमारा इलाखा हैं, म्हणत दुसऱ्या इलाख्यातील तृतीयपंथींना पळवून लावतात. यातूनच टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असते. पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळं ही घटना थोडक्यात आटोपली. पण, अशा घटनांचा उद्रेक केव्हा होईल, काही सांगता येत नाही.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं?

Nagpur Medical | मेडिकलमधील अद्ययावत कँसर हॉस्पिटलचे काय होणार?, बांधकामाचे 33 कोटी परत जाण्याच्या मार्गावर

WhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.