AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात चोवीस तासांत कोरोनाचे पाच बळी; प्रशासनासोबत सामाजिक संस्थांचाही जनजागृतीवर भर

नागपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाच जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. ग्रामीण भागात जनजागृती राबविण्यात येत आहे. गरजूंना मास्क वितरित करून त्यांची गरज भागविण्याचे काम काही सामाजिक संस्था करत आहेत.

नागपुरात चोवीस तासांत कोरोनाचे पाच बळी; प्रशासनासोबत सामाजिक संस्थांचाही जनजागृतीवर भर
कोरोना जनजागृती अभियान राबविताना चंद्रशेखर बावनकुळे, अजित पारसे.
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 2:44 PM
Share

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांत दोन हजारांपेक्षा कमी नोंदविल्या गेली. परंतु गुरुवारी रुग्णसंख्येत वाढ होऊन ती 2211 वर पोहोचली. दिवसभरात शहरातून ४ व ग्रामीणमधील १ अशा ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळं प्रशासनासह नेतेही जनजागृतीवर भर देत आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्यांचं मोठं प्रमाण आहे. त्यामुळेच श्री श्री फाऊंडेशन (Sri Sri Foundation) आणि अजित पारसे (Ajit Parse) यांच्यातर्फे निःशुल्क मास्क वाटप आणि जनजागृती शिबिर घेण्यात आले. भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLA Chandrasekhar Bavankule) यांनी निःशुल्क मास्क वाटप करत, जनजागृती शिबिराची सुरुवात केली. पहिल्या दिवशी कामठी, नरखेड, मौदा, उमरेड परिसरातील नागरिकांना मास्क वाटप करण्यात आलंय. यावेळी सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांची उपस्थिती होती.

सोशल मीडियावरील अफवांना आळा घाला

श्री श्री फाउंडेशनचे संकेत बावनकुळे व सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांच्या या संयुक्त विद्यमाने शहरासह नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत परिसरात नि:शुल्क मास्क वितरण व सोशल मीडियावर कोरोनाबाबतच्या अफवांना आळा घालण्यासाठी जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. कोरोनाचे रुग्ण, बळीसंख्या वाढत असली तरी अजूनही नागरिक मास्क वापरत नाही. ग्रामीण भागात तर परिस्थिती शहराच्या तुलनेत आणखीच वाईट आहे. त्यामुळे शहरासह नगर पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातही मास्कचे नि:शुल्क वाटपासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. बुधवारी कोराडी येथे बावनकुळे यांनी पारसे यांच्या उपस्थितीत मास्क वाटप व जनजागृती मोहिमेला सुरुवात केली.

प्रत्येक वस्ती, घरांपर्यंत नि:शुल्क मास्क

यावेळी नरखेड, कामठी, मौदा, महादुला, उमरेड येथील भाजपा पदाधिकार्‍यांना तसेच नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत सदस्यांना वाटप करण्यासाठी आमदार बावनकुळे यांच्या हस्ते मोठय़ा संख्येने मास्क देण्यात आले. शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, उद्यान, चौकासह ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत मास्क वाटप करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. आता ग्रामीण भागातील प्रत्येक वस्ती, घरांपर्यंत नि:शुल्क मास्क पोहोचविण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवांमुळे दुसर्‍या लाटेत अनेक मृत्यू झाले. या अफवा कशा टाळायच्या, त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी विशेषत: ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळेच ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी दिली.

84.3 टक्के रुग्ण गृहविलगीकरणात

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 270 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढल्याने तीस हजारांपर्यंत पोहोचलेली सक्रिय रुग्णसंख्याही घटू लागली. शहरात ११ हजार ५५५, ग्रामीणमध्ये ५७२७ व जिल्ह्याबाहेरील २४७ असे १७ हजार ५२९ सक्रिय (अँक्टिव्ह) रुग्ण आहेत. यापैकी केवळ १५.७ टक्के म्हणजेच २७६२ जणांनाच मध्यम व तीव्र अशी लक्षणे आहेत. ते मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. लक्षणं नसलेले ८४.३ टक्के म्हणजेच १४ हजार ७६७ रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेत आहेत.

Vande Mataram | नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन, जाणून घ्या उद्यानाची काय राहणार विशेषता

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

गाडी चालवताना भीती वाटते? Simulator समोर बिनधास्त सराव करा, नागपूर RTO ची भन्नाट डोकॅलिटी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.