शहीद सप्ताह सुरु, नक्षलवादी पुन्हा सक्रिय, नक्षलग्रस्त भागात नक्षल कारवायांची शक्यता

आजपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झालाय. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले आहेत.

शहीद सप्ताह सुरु, नक्षलवादी पुन्हा सक्रिय, नक्षलग्रस्त भागात नक्षल कारवायांची शक्यता
संदीप पाटील, पोलीस उप महानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
गजानन उमाटे

| Edited By: Akshay Adhav

Jul 28, 2021 | 2:39 PM

नागपूर : आजपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झालाय. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. २८ जुलै ते ३ ॲागस्ट या काळातील शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवादी घातपात करण्याची दाट शक्यता असते, त्यामुळेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढ पोलीसांनी अलर्ट जारी केलाय.

शहीद सप्ताहा दरम्यान नक्षलवादी कारवायांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलसांनी ॲापरेशन ॲाल आऊट सुरु केलंय. या अंतर्गत गोंदिया आणि गडचिरोली जिल्हयात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली असून, जंगलांमध्ये सी – ६० चे जवान अलर्टवर आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी दिलीय.

शहीद सप्ताह म्हणजे काय?

शहीद सप्ताह हा नक्षलवाद्यांचा वर्षातला सगळ्यात मोठा सप्ताह असतो. ज्या ठिकाणी पोलिसांकडून नक्षल मारले गेलेले आहेत, त्या ठिकाणी स्मारक वगैरे बांधणं, असे प्रकार नक्षली करत असतात, त्याचबरोबर पोलिसांवर हल्ला करण्याचं त्यांचं उदिष्ट असतं.

महाराष्ट्र पोलिस नक्षल्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देण्यास सज्ज

या अनुषंगाने गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये यापुढचे दिवस आपण ऑलआऊट ऑपरेशन राबवत आहोत. त्यांना कोणताही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आपण पोलिस त्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देण्यास तयार आहेत, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.

शहीद सप्ताहात नक्षलवादी काय करतात?

या आठवड्यात नलक्षवादी आयडीचा ब्लास्ट करुन पोलिसांच्या जीवाला धोका पोहोचवतात. पोलिस जंगलात गस्तीसाठी जातात त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करणं, अशा पद्धतीची त्यांची स्टॅटर्जी असते. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना काऊन्टर करण्यासाठी उपाययोजना आखलेल्या आहेत.

गेल्या काही महिन्यात नक्षलवादाचा बिमोड करण्यास गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांचं मनोधैर्य चांगलं आहे. गडचिरोली पोलिस नक्षलींच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड प्रत्त्युत्तर देण्यास तयार आहेत, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.

(Gadchiroli police Alert naxalites Celebrate martyrs week)

हे ही वाचा :

मुंबई-ठाण्यात खंडणीचा गुन्हा, परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली

VIDEO | थांब रे, मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच प्रवीण दरेकरांना गप्प केलं

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें