AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्तव्यासाठी काहीही, बालाघाटच्या महिला डॉक्टरचा भर उन्हात 7 तास प्रवास, नागपूरला पोहचून लगेच रुग्णसेवा

एका तरुण महिला डॉक्टरने आपल्या कर्तव्यासाठी जोखीम पत्करत लांबचं अंतर पार केलं आणि नागपूरला पोहचून रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केलीय.

कर्तव्यासाठी काहीही, बालाघाटच्या महिला डॉक्टरचा भर उन्हात 7 तास प्रवास, नागपूरला पोहचून लगेच रुग्णसेवा
| Updated on: Apr 23, 2021 | 3:01 AM
Share

नागपूर : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाचं प्रमाण देशभरात प्रचंड वाढत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांसोबतच आरोग्य यंत्रणा कमी पडत आहेत. अशातच डॉक्टर्स, नर्स अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच कमतरता जाणवत आहे. त्यामुळेच आहे त्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव वाढलाय. ते रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करत आहेत. याचंच एक ताजं उदाहरण बालाघाटमध्ये दिसलंय. या तरुण डॉक्टरने आपल्या कर्तव्यासाठी अशीच जोखीम पत्करत लांबचं अंतर पार केलं आणि नागपूरला पोहचून रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केलीय. यासाठी तिने भर उन्हात तब्बल 7 तास दुचाकीवरील प्रवास केलाय (Inspiring story of woman doctor from Balaghat who travel Nagpur to complete her duty amid Corona).

आपल्या कर्तव्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही लांबचा प्रवास करत कामावर रुजू होणाऱ्या या महिला डॉक्टरचं नाव प्रज्ञा घरडे असं आहे. त्यांनी कोविड केअर सेंटरला सेवा देण्यासाठी बालाघाटमधून नागपूरपर्यंतचा प्रवास एकटीने पार केला. त्या नागपूरमधील एका खासगी रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये काम करतात.

महिला डॉक्टरची कर्तव्यनिष्ठा पाहून कुटुंबीयांचा विरोधही मावळला

डॉ. प्रज्ञा काही दिवसांपूर्वीच सुट्टीसाठी आपल्या घरी आल्या होत्या. मात्र, नागपुरात कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना कामावर परतण्याची वेळ आली. मात्र, लॉकडाऊन लागल्याने त्यांना बस किंवा ट्रेनने नागपूरला येणं शक्य राहिलं नाही. त्यामुळे अखेर डॉ. प्रज्ञा यांनी स्कुटरवरच बालाघाट ते नागपूर हे अंतर पार करण्याचा निर्णय घेतला.

बालाघाट ते नागपूर 7 तासांचा प्रवास

डॉक्टर प्रज्ञा यांनी कर्तव्यावर परतण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचं कुटुंब त्यांना एकटीला हा लांबचा प्रवास करण्यास अनुकुल नव्हतं. मुलीने इतक्या लांबचा प्रवास असा एकटीने करु नये असंच त्यांचं म्हणणं होतं. मात्र, प्रज्ञा यांचा रुग्णांच्या सेवेसाठीची तळमळ पाहून अखेर घरचेही तयार झाले. त्या सकाळी बालाघाटमधील आपल्या घरून नागपूरसाठी रवाना झाल्या. अगदी भर उन्हातही स्कुटर चावलत त्यांनी दुपारपर्यंत नागपूर गाठलं. तेथे पोहचताच त्यांनी रुग्णांच्या सेवेला सुरुवात केली.

दररोज 12 तासांपेक्षा अधिक पीपीई कीट घालून वैद्यकीय सेवा

डॉ. प्रज्ञा यांना स्कुटरवर बालाघाट ते नागपूर जवळपास 180 किमीचं अंतर पार करायला 7 तासांचा वेळ लागला. कडक ऊन आणि प्रचंड गरम वातावरणामुळे थोडा त्रास झाला. रस्त्यात काही खायला प्यायला पण मिळालं नाही. मात्र, पुन्हा कामावर येऊ शकले याचा आनंद आहे, अशी भावना डॉ. प्रज्ञा यांनी व्यक्त केली. डॉक्टर प्रज्ञा नागपूरमध्ये दररोज 6 तास एका कोविड हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यानंतर त्या सायंकाळी दुसऱ्या एका रुग्णालयात काम करतात. अशाप्रकारे त्यांना दिवसातील 12 तासांपेक्षा अधिक वेळ पीपीई कीट घालून काम करावं लागतं.

हेही वाचा :

डॉक्टरी पेशाला जागणारा ‘देवमाणूस’, भव्य निरोप समारंभ आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर

VIDEO | मुंबईत भगवतीच्या डॉक्टरांना शिवसेना नगरसेविकेची दमदाटी, महापौरांकडून समज, संध्या दोषींचा माफीनामा

व्हिडीओ पाहा :

Inspiring story of woman doctor from Balaghat who travel Nagpur to complete her duty amid Corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.