Nagpur Crime | स्नॅपचॅटवर अनोळखी तरुणाशी मुलीचे प्रेमप्रकरण; तिने न्यूड फोटो पाठविल्यावर सुरू झाला खेळ!

सोशल मीडियाचा वापर वाढला. या माध्यमातून गुन्हेगारीच्या घटनादेखील वाढीस लागल्यात. या प्रकरणातील अनेक गुन्हे पुढे येत आहेत. अशीच एक घटना मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली.

Nagpur Crime | स्नॅपचॅटवर अनोळखी तरुणाशी मुलीचे प्रेमप्रकरण; तिने न्यूड फोटो पाठविल्यावर सुरू झाला खेळ!
प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर : सोशल मीडियावरील आयडीनुसार रितिक मिश्रा हा ओडिशातील रहिवासी आहे. 17 वर्षीय मुलगी ही बारावीत शिकते. ऑगस्ट महिन्यात तिची स्नॅपचॅटवर रितिकशी ओळख झाली. रितिकने तिला ओडिशातील कॉल सेंटरमध्ये काम करीत असल्याचं सांगितलं. स्नॅपचॅटवर दोघांची चॅटिंग होऊ लागली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

आक्षेपार्ह फोटो पाठविले आणि फसली

रितिकच्या प्रेमात तरुणी वाहवत गेली. त्याने केलेली प्रत्येक मागणी ती पूर्ण करीत होती. रितीकने तिला बाथरूममधील फोटो टाकण्यास सांगितले. तिने लगेच तसे फोटो त्याला पाठवले. त्याने अनेकदा तिला अर्धनग्नावस्थेत फोटो मागितले. तरुणीने त्याच्यावर विश्‍वास ठेवून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवले. नोव्हेंबर महिन्यात ती अभ्यासामुळे रितिकशी दुरावा करत होती. यामुळे रितिक नाराज झाला. त्याने चॅटिंग करण्यासाठी दबाव टाकला. माझ्याशी बोलली नाही तर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तिने दुर्लक्ष केले. आणि नको ते झाले.

तिला बोलायला लावा अन्यथा वाईट परिणाम

ती बोलत नाही म्हणून रितिकने तिच्या मोबाईलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून घेतले. त्यातील एका जवळच्या व्यक्तीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले. एवढ्यातच तो थांबला नाही तर त्याने त्या संबंधित व्यक्तीला फोन केला आणि तिला बोलायला लावा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी याबाबत तिला विचारले. सर्व प्रकार पुढे आल्यानंतर तिने रितिकच्या विरोधात मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला. पोलिसांनी रितिकविरुद्ध विनयभंग, पोक्सो ॲक्ट आणि आयटी ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Bhandara | भंडाऱ्यातील जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण; कसा झाला होता 11 बालकांचा होरपळून मृत्यू?

Nagpur ST | नागपुरात एसटी कर्मचाऱ्याने उचलले घातक पाऊल; का केला आत्महत्येचा प्रयत्न?

नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…

Published On - 7:17 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI