Maharashtra Winter Session 2022 Live : आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

| Updated on: Dec 22, 2022 | 11:27 PM

Maharashtra Winter Session 2022 Live Updates : आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

Maharashtra Winter Session 2022 Live : आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
आज अधिवेशनात कोणता विषय गाजणार? विरोधकांच्या भूमिकेकडे लक्षImage Credit source: tv9 marathi

मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Dec 2022 05:35 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या नागपूर दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या नागपूर दौऱ्यावर

    राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकऱ्यांचा पदनियुक्ती सोहळा

    तीन महिन्यांत राज ठाकरे दुसऱ्यादा नागपूरच्या दौऱ्यावर

    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा शुक्रवारचा दौरा महत्त्वाचा

  • 22 Dec 2022 04:15 PM (IST)

    शिवसेना पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार 5 महिन्यांपासून थकला

    नवी दिल्ली : संसदीय पक्षाच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर राहुल शेवाळे यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानं थकले पगार,

    शिवसेनेच्या खासदारांचं कार्यालयीन खाते आहे, त्यावरुन कर्मचाऱ्यांचे वेतन होत असते.

    पगार काढण्यासाठी विनायक राऊत आणि अनिल देसाई यांची सही आवश्यक असते,

    शेवाळे यांनी खात्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानं खात्याला स्टे आहे, तो स्टे काढून टाका,

    ठाकरे आणि शिंदे गटाच्या खासदारांच्या एकत्रित बैठकीत झालेल्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा विषय चर्चेला गेला.

  • 22 Dec 2022 03:57 PM (IST)

    नागपूर : बबनराव पाचपुते रुग्णालयात दाखल

    नागपूर : बबनराव पाचपुते रुग्णालयात दाखल

    भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांची प्रकृती बिघडली

    नागपुरातील विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

    हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले होते

    सकाळी अस्थमाचा त्रास असल्याचे विधिमंडळात परिसरातील उपचार केंद्रात गेले

    बबनराव पाचपुते यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते

  • 22 Dec 2022 02:38 PM (IST)

    दिशा सालियनची केस जरी एस आयटीकडे दिली तरी हाती काही लागणार नाही

    पुणे : दिशा सालियनची केस जरी एस आयटीकडे दिली तरी हाती काही लागणार नाही,

    पाण उतारा करून घेतील, रुपाली पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर टिका,

    एकट्या आदित्यच्या विरोधासाठी शिंदे फडणवीसांनी खोटी फौज उभी केली, आदित्य ठाकरे याला घाबरणार नाहीत,

    दिशा सालियनचं कुटुंब म्हततंय आमची मुलीची बदनामी करू नका, एकदा झालेल्या चौकशीची पुन्हा चौकशी करता येत नाही,

    तुम्हाला कारवाई करायची असेल तर कोर्टात जा, रुपाली पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल.

  • 22 Dec 2022 01:45 PM (IST)

    नवी मुंबई मेट्रोला शुभारंभासाठी मुहूर्त मिळेना?

    नवी मुंबई : नवी मुंबई शुभारंभासाठी मेट्रोला मुहूर्त मिळेना ?

    नवी मुंबई मेट्रो सेवा सुरूबाबतच्या सिडकोकडून सर्व चाचण्या झाल्या आहेत.

    मेट्रो सेवा शुभारंभासाठी तारीख पे तारीख चर्चा सुरू आहे.

    सिडकोने बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम 2011 सुरू केले आहे.

    2018 साली सुरू होणारी मेट्रो सेवा सुरू होत नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजी.

  • 22 Dec 2022 01:41 PM (IST)

    खासदार संजय राऊत यांची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद

    संध्याकाळी 4 वाजता महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद

    नागपूर अधिवेशना दरम्यान झालेल्या गोंधळावर राऊत काय बोलणार ?

    दिशा सालीयान प्रकरण गाजत असतानाच संजय राऊत यांची पत्रकार परिषद

  • 22 Dec 2022 12:12 PM (IST)

    उस्मानाबाद- मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना मोठा दिलासा

    तेरणा साखर कारखाना भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे DRAT कोर्टाचे आदेश

    जिल्हा बँकेनी टेंडर प्रक्रिया राबवलेली योग्य असल्याचे दिले आदेश

    माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली

    भैरवनाथ समूहाला 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यात येणार

    नोव्हेंबर 2021 मध्ये तेरणा कारखान्याने कारवाई झाली होती मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने केली होती कोर्टात याचिका

  • 22 Dec 2022 12:00 PM (IST)

    आम्हाला हलक्यात घेऊ नका, एनएचआय अधिकाऱ्यांना निलेश राणे यांचा इशारा

    रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणे यांची एनएचआय अधिकाऱ्यांची फोन वरून चर्चा,

    कोकणी माणसाशी संघर्ष करू नका, नीलेश राणे यांचा इशारा,

    आम्ही सहकार्य करतोय, आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका,

    तुमच्याकडे अधिकाऱ्यांकडे कुठलीच अधिकृत पत्र नाही,

    जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथे येणार,

    आम्हाला हलक्यात घेऊ नका, एनएचआय अधिकाऱ्यांना निलेश राणे यांचा इशारा.

  • 22 Dec 2022 11:22 AM (IST)

    राहुल शेवाळे आणि संतोष बांगर यांच्यावर चंद्रकांत खैरे यांची आक्रमक प्रतिक्रिया

    संतोष बांगर मटका आणि पत्त्यांचे क्लब चालवून दिवसाला एक लाखाचा हप्ता घेणारा माणूस

    संतोष बांगर यांच्यावर अनेक खुनाचे गुन्हे दाखल आहेत

    संतोष बांगर ला आम्ही सरळ करू

    राहुल शेवाळे याचे अनेक लफडे आहेत, हा एका महिलेला घेऊन परदेशात गेला होता

    त्यावेळी याची बायको उध्दव साहेबांकडे रडत आली होती ती भानगड उध्दव साहेबांनी मिटवली

  • 22 Dec 2022 11:09 AM (IST)

    अमृता फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक

    अमृता फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक

    भारताचे दोन राष्ट्रपिता आहेत हे वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं होतं

    राज्यातील सगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन होणार

    उद्या नागपुरात महिला आघाडी करणार अमृता फडणवीसांविरोधात आंदोलन

    वरिष्ठ स्तरावरून महिला पदाधिकाऱ्यांना आदेश!

  • 22 Dec 2022 10:53 AM (IST)

    हातात श्रीखंडाचा डब्बा हातात घेऊन, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

    दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, राज्यपाल हटावची घोषणाबाजी

    विरोधकांची राज्यपाल आणि राज्य सरकारविरोधात विधानभवनासमोर जोरदार घोषणाबाजी

    राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवाचा बॅनर फडकवला

    आदित्य ठाकरे, रोहित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, सचिन अहिर यांची घोषणाबाजी

  • 22 Dec 2022 09:52 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दुपारी उच्चस्तरीय बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दुपारी उच्चस्तरीय बैठक

    बैठकीत कोविड 19 शी संबंधित परिस्थितीचा घेणार आढावा

    चीनसह अन्य देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क

  • 22 Dec 2022 09:30 AM (IST)

    भंडाऱ्यातील मोहाडीच्या पालिका उपाध्यक्षा विरोधात भाजप सदस्यांचा अविश्वास

    अविश्वास ठराव मांडण्यासाठी 26 डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन

    अविश्वास ठरावाच्या बाजूने असणारे 12 सदस्य भ्रमंतीवर गेले असून ते सोमवारी सकाळीच परत येणार

    विनाकारण शासकीय कामात ढवळाढवळ करणे, न.पं. सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कोणतेही काम करणे इत्यादी कारणावरून हा अविश्वास ठराव आणण्यात आलाय

  • 22 Dec 2022 09:11 AM (IST)

    उर्फी जावेदला बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्याला अटक

    उर्फी जावेदला बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्याला अटक

    नवीन गिरी नावाच्या व्यक्तीला गोरेगाव पोलिसांनी केली अटक

    उर्फीला व्हॉट्स ॲपद्वारे दिली होती बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी

  • 22 Dec 2022 09:07 AM (IST)

    नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आमदारांना सर्दी, खोकला

    तीन दिवसांत 30 आमदारांनी विधानभवन परिसरात केली आरोग्याची तपासणी

    30 पैकी निम्म्या आमदारांना सर्दी खोकला आणि काहींना ताप

    काही आमदारांना मधुमेह, उच्चरक्तदाब

    नागपुरातील थंडीमुळे आमदारांना सर्दी, खोकला

    आतापर्यंत तीन दिवसांत विधानभवन परिसरात एकूण 611 जणांची आरोग्य तपासणी

    611 जणांपैकी 30 आमदारांनी केली तपासणी

  • 22 Dec 2022 09:05 AM (IST)

    सोलापुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.

    अजित वसंतराव पाटील असे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याचे नाव

    स्थानिक नागरिकांनी कारखान्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता तसेच परवाना देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.

    काल रात्री 2 लाखाची लाच स्वीकारताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने अटक केली.

  • 22 Dec 2022 08:27 AM (IST)

    घनसावंगी मतदार संघात भाजप राजेश टोपेना धक्का देण्याच्या तयारीत

    घनसावंगी मतदार संघात भाजप राजेश टोपेना धक्का देण्याच्या तयारीत

    उद्योजक सतीश घाडगे यांचा भाजप मध्ये करून घेतला प्रवेश

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून घेतला प्रवेश

    घनसावंगी मतदार संघातून सतीश घाडगे मैदानात उतरण्याची शक्यता

    राजेश टोपे यांचा 25 वर्षांपासूनचा मतदार संघ पाडण्याची भाजपची रणनीती

    सतीश घाडगे हे घनसावंगी मतदार संघातील साखर उद्योजक

    खाजगी साखर कारखाण्यामुळे सतीश घाडगे यांचा घनसावंगी मतदार संघात दांडगा जनसंपर्क

  • 22 Dec 2022 08:23 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलीस ठाण्याचा कारभार रामभरोसे

    पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलीस ठाण्याचा कारभार रामभरोसे,

    तपास पथकच नसल्याने गुन्हेगार मोकाट,अनेक गंभीर गुन्ह्यातील तपासही थंडावले,

    अवैध धंद्याना अभय दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी 2 अधिकारी आणि 13 कर्मचारी यांना वाहतूक शाखेत संलग्न करण्यात आले आहे,

    सर्वाधिक गुन्हेगारी टोळ्या वाकड परिसरात असल्याने शहरातील सर्वात हॉट पोलीस ठाणे समजले जाते,

    नवनियुक्त पोलीस आयुक्त विनोय कुमार चौबे काय निर्णय घेतला ह्याकडे सर्वांचे लक्ष.

  • 22 Dec 2022 08:20 AM (IST)

    पुण्यात गोवरनं महापालिकेची चिंता वाढवली

    पुणे : पुण्यात गोवरनं महापालिकेची चिंता वाढवली,

    नव्याने 15 जणांचा गोवरचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह,

    15 जणांना लागण तर शहरात रुबेलाचेही दोन रुग्ण आले आढळून,

    कोथरूड आणि खराडीतील 12 आणि 11 वर्षीय मुलाचा समावेश आहे,

    तर एका महिलेलाही गोवरची लागण झाली आहे,

    आतापर्यंत पुण्यात 27 गोवरचे रुग्णाची नोंद झाली आहे.

    महापालिका अलर्ट मोडवर गोवरचं सर्वैक्षण आणि लसीकरण करतीये.

  • 22 Dec 2022 08:16 AM (IST)

    पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना टीडीआर वापरता येणार

    पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांत आता टीडीआर वापरता येणार,

    नगरविकास विभागानं काढले आदेश,

    11 गावांचा (डीपी )आराखडा तयार होत नसल्याने टीडीआर वापरता येत नव्हता,

    मात्र आता नगरविकास विभागानं याला परवानगी दिली आहे.

    राखीव जागा आता टीडीआरच्या माध्यमातून संपादिय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 22 Dec 2022 07:34 AM (IST)

    राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक

    कोल्हापूर जयसिंगपूरसह गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूक लांबणीवर

    बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती, नागपूर खंडपीठाचा निर्णय

    ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावं बाजार समित्यांच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी याचिका

    बाजार समित्यांसाठी 29 जानेवारीला होणार होतं मतदान

    तर येत्या शुक्रवारपासून सुरू होणार होती अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

  • 22 Dec 2022 06:55 AM (IST)

    आज मोर्चांचा दिवस, हिवाळी अधिवेशनावर एकूण 12 मोर्चे धडकणार

    पोलीस पाटलांच्या संघटनेसह विविध संघटनांचे आज मोर्चे धडकणार

    सर्व मोर्चे झिरो मैल येथे सर्व मोर्चे अडवले जाणार

    मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  • 22 Dec 2022 06:11 AM (IST)

    आमदार निवासाच्या टॉयलेटमध्ये कपबश्या धुतल्या जातात, आमदार अमोल मिटकरींचा आरोप

    भाजपने कोट्यवधीचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे

    तिरंगी ध्वजाने इमारती पुसल्या गेल्या आहेत

    कंत्राटदाराला 100 कोटी गेले कुठे?

  • 22 Dec 2022 06:07 AM (IST)

    संजय राऊत यांचे निकटवर्तीय ठाकरे गटाचे नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी नागपुरात दाखल

    ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक धक्का

    आज सकाळी चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Published On - Dec 22,2022 6:05 AM

Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.