अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी…; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं फटकारलं

Congress Leader Nana Patole on Ashok Chavan : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा अशोक चव्हाणांवर घणाघात; म्हणाले, अशोक चव्हाण यांची लायकी... माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करणारा काँग्रेसचा बडा नेता कोण? कुणी डागलं टीकास्त्र? वाचा सविस्तर.....

अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी...; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं फटकारलं
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 2:01 PM

भ्रष्टाचारी लोकांसाठी आमची दारं उघडी असं भाजपचे नेते सांगतात. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या भरवशावर मालमत्ता कमावली. भ्रष्टाचार केले. सत्ता भोगली. आता भाजपत गेले. अशोक चव्हाण यांची स्वतःची ओळख काय? आज त्यांच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची हालत खराब आहे. स्वतःचं स्वत:चे कपडे फाडतो अशी अशोक चव्हाण यांची सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचं बघा… काँग्रेसवर बोलण्याची लायकी अशोक चव्हाण यांची नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर बोलू नये हा माझा त्यांना सल्ला आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी घणाघात केला आहे.

“प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार”

प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसला काही जागांवर त्यांनी पाठिंबा दिला आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चार दिवसांत प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार आहे. त्यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे. योग्य वेळेची संधी पाहतोय. पहिल्या टप्प्यात आजपासून काँग्रेसचा प्रचार जोमानं सुरु झालाय. पहिल्या टप्प्यातील पाचंही जागा आम्ही जिंकू असं आजचं चित्र आहे, असं नाना पटोले म्हणाले.

सांगलीच्या जागेचा तिढा कधी सुटणार?

सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवार दिला. यावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. सांगली आणि कराडचा प्रश्न आज सुटेल, तशी प्रक्रिया चालली आहे. यापेक्षा महायुतीत जास्त गोंधळ आहे. सांगली भिवंडी आणि मुंबई जगावर थांबली होती. काल बैठक झाली. दिल्लीतून काय चर्चा झाली. जो आदेश दिला जाईल. त्याचं पालन करू, असं नाना पटोले म्हणाले.

2014 आणि 2019 लोक कोणी फिक्सिंग केलं? हे पुराव्यासहीत सांगणार आहे. भाजपची बी पार्टी कोण? हे योग्य वेळी मांडू. अंगावर आलं तर त्याचं उत्तर देऊ. प्रमाणिकपणे उत्तर देऊ. आता खूप झालं. नाना पटोले पण वंचित आहे. मागासवर्गीय आहे. शेतकऱ्याचा पोरगा आहे. एका वंचिताला तसं टार्गेट केलं जातंय. मला टार्गेट का केलं?, हे प्रश्न विरोधकांना विचारा, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.