Nagpur election | नागपूर मनपा निवडणूक: रिपब्लिकनला गोंजारणे सुरू; काँग्रेस मूडमध्ये, भाजपचा संकल्प काय?

महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजपने संकल्प केलाय. तो म्हणजे १२० जागा निवडूण आणायचा. यासाठी नियोजन आणि तयारीसुद्धा सुरू आहे. तर दुसरीकडे अंतर्गत धुसफुस, निष्क्रिय नगरसेवकांविषयी नाराजी आहे. मतांसाठी रिपब्लिकन गटांना गोंजारणे सुरू आहे.

Nagpur election | नागपूर मनपा निवडणूक: रिपब्लिकनला गोंजारणे सुरू; काँग्रेस मूडमध्ये, भाजपचा संकल्प काय?
नागपूर महापालिका
Image Credit source: tv 9
गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 12, 2022 | 4:27 PM

नागपूर : मागील नागपूर महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation, Election) काँग्रेस नेत्यांनी आपसात भांडून आणि एकमेकांचा पत्ता साफ केला. त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे दीडशेपैकी 108 जागा भाजनं जिंकल्या. आता किमान हा आकडा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. उमेदवारी देण्यापूर्वी सर्वे केला जाईल. जो जनतेत असेल त्याला उमेदवारी दिली जाईल, असे भाजपतर्फे सांगितले जात आहे. पंधरा वर्षांत भाजपने केलेली कामे जनतेपुढे आणण्याचे काम सुरू आहे. नागपूर महापालिकेत 120 चा आकडा गाठणे भाजपचा संकल्प असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Praveen Datke) यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षांना जवळ करणे सुरू

काँग्रेसमधील भांडणे कमी झालीत. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळं यंदा काँग्रेस लढण्याच्या मूडमध्ये आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे नाराजीत आणखी भर पडली आहे. निम्म्या नगरसेवकांनी कामच केले नाही. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. पक्षातर्फे वारंवार इशारा आणि तिकीट कापण्याचे संकेत दिले जातात. याचा फटका कुणाला बसतो हे तिकीट वाटपानंतर कळेल. महापालिकेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या गटांना काँग्रेस आणि शिवसेनेने जवळ करणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीकडूनही रिपब्लिकन पक्षांना जवळ करणे सुरू आहे. भाजपने अनेक गटांशी आधीच हातमिळवणी केली आहे.

प्रारूप आराखडा जाहीर होणे बाकी

नागपूर शहरात कवाडे, कुंभारे, आठवले, शेंडे, गवई, आंबेडकर या प्रमुख नेत्यांच्या गटांसह रिपब्लिकन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटना आहेत. मनपा निवडणुकीत हे सर्व गट सक्रिय होतात. भाजप आणि काँग्रेस उमेदवारी देताना रिपब्लिकन पक्षांना वाटा देतात. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. तीन प्रभागाचा निर्णय आधीच झाला आहे. आता फक्त प्रारूप आराखडा जाहीर व्हायचे बाकी आहे. त्यामुळे विविध पक्ष व संघटनांच्या बैठकांना जोर आला आहे.

Nagpur Medical | अखेर भेट झाली! महिनाभरापासून सुरू होते उपचार; घरच्यांना पाहिल्यावर झाले स्मरण

Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन

Nagpur Corona | लग्नसमारंभात पन्नास जणांनाच परवानगी; पण, लक्षात कोण घेतोय?, नागपूर मनपा प्रशासन उगारतोय बडगा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें