AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर पोलिसांकडून 19 हजार रिक्षाचालकांच्या रेकॉर्डची तपासणी, गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष मोहीम

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी शहरातील 19 हजार रिक्षा चालकांचे गुन्हेगारी रेकॉड तपासण्याचे काम सुरू केले आहे.

नागपूर पोलिसांकडून 19 हजार रिक्षाचालकांच्या रेकॉर्डची तपासणी, गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष मोहीम
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 12:03 AM
Share

नागपूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी शहरातील 19 हजार रिक्षा चालकांचे गुन्हेगारी रेकॉड तपासण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्यात 300 पेक्षा अधिक रिक्षाचालकांवर वेगवेगळे गुन्हे असल्याचं निष्पन्न झालं आहे. याच बरोबर वाहतुकीचे वारंवार नियम तोडणाऱ्या रिक्षाचालकांसह इतर वाहन चालकांचे रेकॉर्डदेखील तपासले जात आहे. या सर्वांचा वाहन परवाना निलंबित केला जाणार आहे. (nagpur police checking records of auto rickshaw drivers to stop criminal cases)

19 हजार रिक्षा चालकांचे रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात 

नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्वात आधी ऑटो चालकांना शिस्त लाजण्याची नितांत गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात होतं. त्यानंतर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नोंदणीकृत 19 हजार रिक्षाचालकांचे रेकॉर्ड तपासण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यात तब्बल 300 पेक्षा अधिक रिक्षाचालकांच्या संदर्भात गुन्हे असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय अनेक परवानाधारक ऑटो मालक स्वत:च्या नावावर नोंदणी असलेला ऑटो इतर कुणालातरी भाड्याने देऊन व्यवसाय करतात. ऑटो नेमका कोणाला दिलेला आहे, याची जर मालकाला माहिती नसेल तर त्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. नागपूर पोलिसांच्या या मोहिमेमुळे वाढत्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

अनाधिकृतरित्या रिक्षा चालवणाऱ्यांची  माहिती कोणाकडेही नाही

नागपूर शहरात परवानाधारक ऑटो रिक्षांचालकांची संख्या 19 हजार इतकी आहे. यामध्ये शहरात अनाधिकृतरित्या रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या नेमकी किती आहे ? या संदर्भातील आकडेवारी पोलीस विभागासह प्रादेशिक परिवहन विभागाकडेसुद्धा नाही. गेल्या काही वर्षाचा रेकॉर्ड तपासल्यानंतर अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये ऑटोचा उपयोग झाल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक घटनांमध्ये ऑटोचालकांसंदर्भात तक्रारीदेखील आल्या आहेत.

गुन्हेगारी पसरविणारे रिक्षाचालक समोर येतील

दरम्यान, या मोहिमेबद्दल बोलताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी “नागपूर पोलिसांनी सुरू केलेले अभियान चांगले असून या मध्यातून गुन्हेगारी पसरविणारे रिक्षाचालक चालक समोर येतील. तसेच प्रवाशांनाही सुरक्षितता वाढल्याचे वाटेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

इतर बातम्या :

Pune | ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं

धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…ढकलेला मित्र जागेवर गतप्राण…नाशिकमधली चटका लावणारी घटना

(nagpur police checking records of auto rickshaw drivers to stop criminal cases)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.