VIDEO: कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत भ**गिरी केली नाही, त्यांच्याकडून झाडं लावून घ्या : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आता वर्ध्यात त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय आलाय.

VIDEO: कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत भ**गिरी केली नाही, त्यांच्याकडून झाडं लावून घ्या : नितीन गडकरी
Gadkari's old video viral, expose govet
चेतन व्यास

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 17, 2021 | 6:59 PM

वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आता वर्ध्यात त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय आलाय. रस्त्यांची कामं करणाऱ्या ठेकेदारांकडून वृक्षारोपण करण्यात होणारी कामचुकवेगिरीवर निशाणा साधत गडकरींना सार्वजनिकपणे या कॉन्ट्रॅक्टरचा समाचार घेतलाय. मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत भ**गिरी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून झाडं मोजून लावून घ्या. ती झाडं लावली पाहिजे याची व्यवस्था करा, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सातवरील हिंगणघाट येथे नांदगाव चौरस्त्यावरील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरातील कार्यक्रमात ते बोलत होते (Nitin Gadkari criticize road contractor publicly for not planting trees on highway in Wardha).

नितीन गडकरी म्हणाले, “बुटीबोरी, वर्धा, यवतमाळ, लातूर, तुळजापूर हा रस्ता जगातील सुंदर रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. पण या रस्त्यावर झाडं नाहीत. त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्टरचं बिल रोखलंय. अग्रवाल साहेबांना वृक्षारोपण होत नाही तोपर्यंत त्याचं एकही बिल देऊ नका असं सांगितलंय. तसेच झाडं न लावल्यानं त्याच्यावर कार्यवाह करा म्हणूनही सांगितलं.”

“ठेकेदाराकडून पैसे घेऊन भ**गिरी केलेली नाही, त्यामुळे झाडं मोजून लावून घ्या”

“आता 80 हजार खड्डे केले आहेत आणि 3 मीटरचे मोठे वृक्ष लावत आहेत. आता किती वृक्ष लागले, किती नाही लागले, किती जीवंत आहेत ही जबाबदारी तुमची आहे. कॉन्ट्रॅक्टरसोबत आपण कोणती भ**गिरी केलेली नाही. कोणता पैसा घेतला नाही. तुम्ही झाडे मोजा आणि ती लावून घ्या. ती लागली पाहिजे, याची व्यवस्था करा,” असंही गडकरी यांनी नमूद कलं.

या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर कुणावार, पंकज भोयर, दादाराव केचे, रामदास आंबटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे आदींची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या शैलीत कॉन्ट्रॅक्टरचा समाचार घेतला. तसेच त्यांनी विकासकामांची माहिती दिली. त्यामुळे सध्या सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या औद्योगिक शहराची नगरपरिषद दत्तक, नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल

नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात; काँग्रेसच्या नेत्याकडून प्रशंसा

Video: Youtube चॅनलमधून गडकरी महिन्याला किती कमावतात? पहिल्यांदाचा जगजाहीर खुलासा, ऐका त्यांच्याकडूनच!

व्हिडीओ पाहा :

Nitin Gadkari criticize road contractor publicly for not planting trees on highway in Wardha

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें