देशाला आत्मनिर्भर बनवायचंय, त्यासाठी काय करावं लागेल?, नितीन गडकरींनी सांगितलं

भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर आम्ही बायो फ्युल एक्स्पोर्ट करणारा देश बनायला पाहिजे, असंही गडकरी म्हणाले.

देशाला आत्मनिर्भर बनवायचंय, त्यासाठी काय करावं लागेल?, नितीन गडकरींनी सांगितलं
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 2:30 PM

सुनील ढगे, Tv 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : भारताच्या विकासात असमतोल आहे तो दूर झाला पाहिजे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. गरीब – श्रीमंतीचं अंतर कमी झालं पाहिजे. समाजात सामाजिक विषमता आहे. तशीच आर्थिक विषमताही आहे. ती दूर करावी लागेल. ग्रामीण भागात विकास कमी आहे. शहरात काही प्रमाणात वाढला. त्यामुळे गावातील लोक मजबूर होऊन शहरात येतात. शहरात समस्या निर्माण होतात. त्यामुळं गावात विकास झाला पाहिजे. तिथे रोजगार निर्माण झाला पाहिजे. गावांना शक्तिशाली संपन्न बनवायचं आहे. त्या ग्रामीण भारताच्या विकासासाठी आम्हाला मोठा प्रयत्न करण्याची गरज आहे. असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते भारत विकास परिषदच्या संमेलनात आज बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. आम्ही आता अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आम्ही सुराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, आम्हाला स्वराज्य मिळालं आता सुराज्य निर्माण करायचा आहे. आज आपल्या देशात उद्दिष्ट शिवाय कुठलंही काम होत नाही.

आमचं उद्दिष्ट निश्चित आहे. आम्ही काम करत आहोत. मात्र अजून उद्दिष्टापासून दूर आहोत. त्यासाठी वेग वाढवावा लागेल. आम्ही जगातील 5 वी अर्थव्यवस्था आहोत. मी मंत्री होतो तेव्हा दुर्गम भागात अनेक रस्ते बनविले. दुर्गम भागात आजही सुविधा नाहीत. मी संकल्प केला आहे की, या देशातून पेट्रोल, डिझेल संपवायचं आहे. यामुळे प्रदूषण होतं. मी इलेक्ट्रिक, इथेनॉलच्या वापरावर जोर देत आहे. यावर चालणारी वाहनं बनत आहेत.

देशाला विश्वगुरू बनवायचंय

बायो फ्युलंमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल. भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर आम्ही बायो फ्युल एक्स्पोर्ट करणारा देश बनायला पाहिजे, असंही गडकरी म्हणाले.

दिव्यांगांना चष्मे वाटणे करणे, साहित्य देणे हे काम आहे. पण पर्याप्त नाही. देशाला विश्वगुरू बनवायचं आहे तर अधिक गतीने काम करावं लागेल. कमी वेळात जास्त काम कसं करता येईल, यावर विचार झाला पाहिजे.

हवेत उडणारी बस आणण्याचा आम्ही विचार करतो आहोत. विकासासाठी फक्त मेहनत करून चालत नाही. त्यासाठी योग्य दृष्टी पाहिजे, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.

उद्दिष्ट ठेऊन काम करा

भारत विकास परिषदेच्या नावातचं विकास आहे. मातृभूमी भय, भूक यापासून मुक्त असावी. जगातील विश्वगुरु बनायचं आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकास परिषद काम करते. स्वराज्य व सुराज्य यासाठी समाजात परिवर्तन आवश्यक आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येतोय.

संघर्षाचा इतिहास आहे. स्वराज्य मिळालं आता सुराज्य मिळावा. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. येथील व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी गुलाम बनविलं. बलशाली राष्ट्र निर्माण करणे, हा उद्देश होता. उद्दिष्टाशिवाय काही कारण नाही. उद्दिष्ट निश्चित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.