नागपुरात सुरू होणार वैमानिक प्रशिक्षण, विभागीय आयुक्तांची माहिती

वैमानिक प्रशिक्षणासाठी नवी दिल्लीच्या नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे १५ नोव्हेंबर २0२३ पर्यंत मान्यता देण्यात आली. नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात यावी, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकासुद्धा दाखल झाली होती.

नागपुरात सुरू होणार वैमानिक प्रशिक्षण, विभागीय आयुक्तांची माहिती


नागपूर : नागरी विमान उड्डयण महासंचालनालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यामुळे नागपुरात वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता करण्यात आली. त्यामुळं वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

वैमानिक प्रशिक्षणासाठी नवी दिल्लीच्या नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे १५ नोव्हेंबर २0२३ पर्यंत मान्यता देण्यात आली. नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात यावी, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकासुद्धा दाखल झाली होती. नागपूर फ्लाइंग क्लब येथे २0१७ पासून वैमानिक प्रशिक्षण बंद होते.

या वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ तसेच क्लबकडे असलेले चारही विमाने सज्ज करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात आले. तसेच उपमुख्य उड्डाण निर्देशक हे पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेण्यात आली.

डीजीसीएची प्रशिक्षणाला मंजुरी

आवश्यक असलेल्या सर्व पदांची भरती करण्यात येऊन विमानांची फिटनेस व मेन्टनन्स (एफटीओ) लायसन्स प्राप्त झाल्यानंतर नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) प्रशिक्षणासाठी मंजुरी मिळाली. अशी माहिती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली. नागपूर फ्लाइंग क्लबला प्रशिक्षणासाठी तसेच फ्लाइंग क्लब नव्याने सुरू करण्यासाठी डीजीसीएचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातर्फे सहकार्य मिळाले. याबद्दल विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आभार मानले. वैमानिक प्रशिक्षण सुरू झाल्यामुळं स्थानिकांना प्रशिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. ही सुविधा प्राप्त झाल्यानं युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

इतर बातम्या 

हाय कोर्टाची पोलीस आयुक्तांना नोटीस, गंगा जमुना परिसर सील का केला अशी विचारणा

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI