Nagpur | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबिर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. काही पात्र शेतकरी त्रृटीअभावी हा लाभ घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबीर आयोजित केलं आहे.

Nagpur | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबिर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:42 AM

नागपूर : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) 2019 पासून सुरू केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात 25 मार्च रोजी लाभार्थ्यांच्या नोंदणीतील त्रुटींची दुरुस्ती करण्यासाठी गाव पातळीवर शिबीर होणार आहे. पात्र शेतकऱ्यांची त्रुटी पूर्तता व्हावी, यासाठी ही शिबिर होणार आहेत. यासाठी स्वत:चे बँक पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमिनीचा सातबारा व 8-अ चा उतारा आदी कागदपत्रे गावासाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे द्यावीत. असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी केले आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (eligible farmer family) दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन हजार असे सहा हजार रुपयांचा लाभ प्रती वर्षी दिला जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत योजनेच्या पोर्टलवर एकूण 2 लाख 10 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु काही लाभार्थी ट्रान्झाक्शन फेल्युअर, आधार कार्ड दुरुस्ती, पीएफएमएसने नाकारणे आदी कारणांनी लाभापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 25 मार्च रोजी होणाऱ्या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार जागृती स्पर्धेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 2022 अंतर्गत प्रश्न मंजुषा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टर डिजाईन, गाण्याची स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा 15 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्साह बघता भारत निवडणूक आयोगाने सर्व स्पर्धांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या स्पर्धमध्ये स्पर्धकांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाने https://ecisveep.nic.in/contest/ या वेबलिंकवर जावून सहभागी व्हावे. तसेच क्युआर कोडवर मोबाईलद्वारे स्कॅन करूनदेखील स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.

BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल

संपादक रश्मी ठाकरेंच्या दै. सामनात श्रीधर पाटणकरणांची बातमी कुठे होती? ‘सामना’तील बातमीची Inside स्टोरी

Pune crime : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ काढून धमकीही दिली?

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.