शिंदे गटाचा हिवाळी अधिवेशनात पुन्हा करेक्ट कार्यक्रम?, अनेकांचा प्रवेश होणार; खासदार तुमाने यांचा दावा

शिंदे-फडणवीस यांनी दुपारी बरोबर 12.45 वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते.

शिंदे गटाचा हिवाळी अधिवेशनात पुन्हा करेक्ट कार्यक्रम?, अनेकांचा प्रवेश होणार; खासदार तुमाने यांचा दावा
शिंदे गटाचा हिवाळी अधिवेशनात पुन्हा करेक्ट कार्यक्रम?, अनेकांचा प्रवेश होणार; खासदार तुमाणे यांचा दावा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 4:53 PM

नागपूर: शिंदे गटाकडून ठाकरे गटावर सातत्याने धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात येण्याचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे शिंदे गट मजबूत होताना दिसत आहे. आता नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठा हादरा दिला जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात अनेकांचे शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. तुमाणे यांच्या दाव्यामुळे शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाचा कार्यक्रम केला जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

शिंदे गटात यायला अनेकजण तयार आहेत. मात्र ही वेळ ते बोलण्याची नाही. हिवाळी अधिवेशन काळात मोठा प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे. त्यावेळी तुम्हाला दिसेलच. हिवाळी अधिवेशनात पक्ष प्रवेश होईल. मात्र आज त्याविषयी बोलणार नाही. अजून अधिवेशनाला वेळ आहे. त्यावेळी तुम्हाला माहीत पडेल, असं खासदार कृपाल तुमाने म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या घरी मुलाच्या लग्नानिमित्त भेट द्यायला येत आहेत. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. समृद्धी मार्गाची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान समृद्धी मार्गाचं उद्घाटन करणार आहे, असं खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं. समृद्धी मार्ग हा विदर्भ आणि महाराष्ट्रच्या विकासाची गंगा आहे. त्यामुळे मोठा विकास होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 530 किलोमीटरच्या महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळपासून या महामार्गाची पाहणी सुरू केली आहे. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घरी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त भेट दिली.

शिंदे-फडणवीस यांनी दुपारी बरोबर 12.45 वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांच्या समवेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किमी आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्हे 26 तालुके 392 गावातून हा महामार्ग जात आहे. त्यामुळे नागपूर येथील झिरो पॉईंट या ठिकाणावरून उभय नेत्यांनी प्रवासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काही मिनिटांसाठी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर अनेक ठिकाणी खास आग्रहाने त्यांचे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.