राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन नागपूर महापालिका?, सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

नागपूर महानगरपालिका निवडणूकीला सहा महिने कालावधी असला, तरिही भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंब्बर कसलीय. काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही तयारी सुरु केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन नागपूर महापालिका?, सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
supriya sule
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 3:33 PM

नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीची पिडा लागल्याने, नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आता आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्ष संघनेत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आज सुप्रिया सुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आगामी मनपा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस देखील यंदाच्या नागपूर महापालिका निवडणुकीत ताकदीनं उतरणार असल्यानं यावेळी चुरस वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक 6 महिन्यांवर

नागपूर महानगरपालिका निवडणूकीला सहा महिने कालावधी असला, तरिही भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंब्बर कसलीय. काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही तयारी सुरु केलीय. आज सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय.

नागपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण सदस्य: 151

भाजप :108

काँग्रेस: 29

बसपा : 10

इतर :04

माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये पोहोचवल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडासावेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असं त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडी मजबूत

ठाकरे-फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण 25 वर्षे या राज्याची सेव करेल, असं त्या म्हणाल्या.

आरोपात तथ्य असेल तर चौकशी करू

नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून भरती होत आहे. त्याच्या चौकशीचीही मागणी होत आहे. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. चौकशीची मागणी होत असेल आणि त्यात खरे पणा असेल तर कुणाचीही चौकशी करावी. आमचं काही दडपशाहीचं सरकार नाहीये. मागणी असेल तर माहितीचा अधिकार हा मनमोहन सरकारने दिला आहे. पारदर्शक कारभारासाठीच त्यांनी हा अधिकार दिला आहे. आताच्या केंद्र सरकारने माहितीचा अधिकारावर बऱ्याच यंत्रणा आणल्यात. आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना पारदर्शकपणा काय असतो हे आम्ही दाखवून दिलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या पदभरतीची कोणी चौकशीची मागणी करत असेल तर त्याचा तो अधिकार आहे, असं त्या म्हणाल्या.

 इतर बातम्या:

मी इम्पलसिव्ह आयुष्य जगत नाही, माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही; सुप्रिया सुळेंची जोरदार बॅटिंग

VIDEO: भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या, सुप्रिया सुळे का म्हणाल्या ईडीच्या कारवायांचं स्वागत?; वाचा सविस्तर

Supriya Sule take review meeting of NCP Party Workers for preparation of Nagpur Municipal Corporation

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.